IND vs PAK सामन्यासाठी जय्यत तयारी; दिग्गजांची उपस्थिती अन् अरिजितच्या गाण्याचा 'सूर'

 ICC world cup 2023 : विश्वचषकात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान १४ ऑक्टोबरला आमनेसामने असणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 02:52 PM2023-10-11T14:52:29+5:302023-10-11T14:53:14+5:30

whatsapp join usJoin us
   Amitabh Bachchan, Rajinikanth and Sachin Tendulkar will come to watch ind vs pak match in ICC world cup 2023, famous singer Arijit singh will perform | IND vs PAK सामन्यासाठी जय्यत तयारी; दिग्गजांची उपस्थिती अन् अरिजितच्या गाण्याचा 'सूर'

IND vs PAK सामन्यासाठी जय्यत तयारी; दिग्गजांची उपस्थिती अन् अरिजितच्या गाण्याचा 'सूर'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अहमदाबाद : आयसीसी वन डे विश्वचषकात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान १४ ऑक्टोबरला आमनेसामने असणार आहेत. या बहुचर्चित सामन्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना पार पडेल. लक्षणीय बाब म्हणजे चालू विश्वचषकाची ओपनिंग सेरेमनी न झाल्याने चाहत्यांना धक्का बसला. याचीच कमी भरून काढण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यात दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले आहे. हा अधिकृत उद्घाटन सोहळा नसून या सामन्यादरम्यान क्रिकेट जगतातील आणि बॉलिवूडमधील अनेक स्टार्स अहमदाबाद स्टेडियमवर हजेरी लावणार आहेत.  

माहितीनुसार, दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि रजनीकांत भारत-पाकिस्तान सामन्याचे साक्षीदार होणार आहेत. याशिवाय भारतरत्न महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर देखील हा सामना पाहण्यासाठी उपस्थित असेल. प्रसिद्ध गायक अरिजित सिंग गायनाच्या माध्यमातून चाहत्यांचा उत्साह वाढवेल. सामन्यादरम्यान आतषबाजी किंवा लेझर शो देखील होईल. मात्र, यासंदर्भात बीसीसीआय किंवा आयसीसीने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

विश्वचषकासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघ - 
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, सॅम मीर, हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनिअर, हसन अली आणि शाहीन आफ्रिदी.

राखीव खेळाडू - मोहम्मद हारिस, जमान खान, अबरार अहमद. 

वन डे विश्वचषकातील भारताचे पुढील सामने - 
भारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबाद
भारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणे
भारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशाला
भारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौ
भारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबई
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाता
भारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू

Web Title:    Amitabh Bachchan, Rajinikanth and Sachin Tendulkar will come to watch ind vs pak match in ICC world cup 2023, famous singer Arijit singh will perform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.