Join us  

अमित शहा यांचा मुलगा आता बीसीसीआयमधून आयसीसीमध्ये जाणार

आज झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 5:20 PM

Open in App

मुंबई : भारताचे गृह मंत्री अमित शहा यांचा मुलगा सध्या बीसीसीआयमध्ये आहे. पण यापुढे जय हे आयसीसीमध्ये जाणार आहेत. आज झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

सध्याच्या घडीला जय हे बीसीसीआयचे सचिव आहेत. जेव्हा बीसीसीआयच्या कार्यकारीणीची निवड होणार होती. त्यावेळी जय हे बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होणार, अशी चर्चा होती. पण गांगुली यांना यावेळी अध्यक्षपद देण्यात आले आणि जय यांच्याकडे सचिवपद देण्यात आले.

प्रत्येक क्रिकेट मंडळाचा एक प्रतिनिधी आयसीसीमध्ये पाठवायचा असतो. साधारणत: देशाच्या मंडळाचे अध्यक्ष हे आयसीसीवर जातात, असे पाहिले गेले आहे. पण यावेळी ही जबाबदारी बीसीसीआयने सचिव जय यांच्यावर सोपवली आहे. जय हे बीसीसीआयचे आयसीसीमध्ये प्रतिनिधीत्व करतील. बीसीसीआयच्याकडून आयसीसीच्या बैठकीला जाण्याचा अधिकार त्यांच्याकडे असेल. त्याचबरोबर बीसीसीआयचे म्हणणे ते आयसीसीकडे मांडू शकतील.

आता २०२४पर्यंत बीसीसीआयमध्ये दादागिरी चालणार; आजच्या बैठकीत मोठा निर्णय बीसीसीआयच्या आज झालेल्या बैठकीमध्ये अध्यक्षपदाबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार आता भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी २०२४ सालापर्यंत राहू शकतात.

जेव्हा गांगुली यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होता, तेव्हा त्यांचा कार्यकाळ हा ९ महिन्यांचा असेल, असे सांगण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीच्या निर्णयानुसार हा कार्यकाळ ठरवण्यात आला होता. पण हा नियम बदलण्याची मागणी करण्यात आली आणि सर्वोच्च न्यायालयानेही या गोष्टी परवानगी दिल्यामुळे आता सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी २०२४ सालापर्यंत राहू शकतात.

सचिवाचे अधिकार वाढविण्यावर भरसध्याच्या संविधानात बोर्डाचा मुख्य सूत्रधार सीईओ आहे; पण यापुढे सचिवानेच कामकाज पाहावे आणि सीईओ हा सचिवाच्या अंतर्गत असावा, असे पदाधिकाºयांना वाटते. आमसभेत मागील तीन वर्षांतील जमा-खर्चाला मंजुरी प्रदान करण्यात येणार आहे.क्रिकेटसंदर्भात निर्णय घेण्यासाठी सीएसी आणि विविध समित्यांची घोषणा आमसभेत केली. सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि गांगुली यांनी सीएसीमधून माघार घेतल्यानंतर कपिल देव, शांता रंगास्वामी आणि अंशुमन गायकवाड यांच्या समितीने पुरुष संघाचा मुख्य कोच निवडला होता. रंगास्वामी आणि गायकवाड हे खेळाडूंचे प्रतिनिधी या नात्याने ‘बीसीसीआय’मध्ये आले आहेत.निवड समितीची नियुक्ती हा सीएसीचा विशेषाधिकार आहे. याशिवाय नवा लोकपाल आणि नैतिक अधिकारीदेखील निवडला जाणार आहे. या भूमिकेत असलेले न्या. डी. के. जैन यांचा कार्यकाळ फेब्रुवारीत संपणार आहे.हितसंबंधांच्या वादग्रस्त मुद्द्यावर चर्चाआमसभेत हितसंबंधांच्या वादग्रस्त मुद्द्यावर चर्चा अपेक्षित असून, बीसीसीआयमधील सर्वांत गंभीर मुद्द्यांंपैकी हा एक आहे. अनेक खेळाडूंनी हितसंबंधांच्या मुद्द्यावर तीव्र नापसंती व्यक्त केली असून, सीओएनेदेखील आपल्या अंतिम अहवालात यात बदलाची भूमिका मांडली होती.दरम्यान, अमोल काळे हे एमसीएचे प्रतिनिधित्व करतील. तमिळनाडू क्रिकेट संघटनेचे प्रतिनिधित्व आरएस रामास्वामी किंवा रूपा गुरुनाथ करू शकतात. रूपा ही श्रीनिवासन यांची कन्या आहे. बंगाल संघटनेचे प्रतिनिधी सचिव अभिषेक दालमिया असतील.

टॅग्स :जय शाहअमित शहासौरभ गांगुलीबीसीसीआयआयसीसी