Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे

Amit Mishra Retirement : टीम इंडियात अल्प संधी, पण IPL मध्ये मोठी कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 14:37 IST2025-09-04T14:31:42+5:302025-09-04T14:37:03+5:30

whatsapp join usJoin us
Amit Mishra Announces Retirement From All Forms Of Cricket Career 25 Years Longer Than Sachin Tendulkar | Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे

Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Amit Mishra Retirement : आर. अश्विन  याच्यानंतर आता भारताच्या आणखी एका फिरकीपटूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. २५ वर्षांच्या कारकिर्दीनंतर लेग स्पिनर अमित मिश्रा याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. टीम इंडियाकडून त्याला फारशी संधी मिळाली नसली तरी लेट निवृत्तीसह त्याने थेट क्रिकेटचा देव आणि विक्रमादित्य अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठी कारकिर्द या टॅगसह तो क्रिकेटमधून निवृत्त झालाय. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

सर्वाधिक हॅटट्रिकचा विक्रम

अमित मिश्रा याने आयपीएलमध्ये आपल्या फिरकीतील खास जादू दाखवून दिली आहे. जगातील सर्वात लोकप्रिय अन् श्रीमंत लीगमध्ये या पठ्ठ्यानं सर्वाधिक वेळा हॅटट्रिकचा डाव साधल्याचा रेकॉर्ड आहे. अमित मिश्रानं आपल्या मोठ्या कारकिर्दीत IPL मध्ये तीन वेळा हॅटट्रिक घेतली आहे. अन्य कोणत्याही गोलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.

अमित मिश्राची क्रिकेट कारकिर्द ठरली सचिन तेंडुलकरपेक्षा मोठी 

अमित मिश्रानं टीम इंडियाकडून २२ कसोटी, ३६ वनडे आणि १० टी २० सामने खेळला आहे. यात त्याने अनुक्रमे ७६, ६४ आणि १६ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. २०१६ मध्ये त्याने टीम इंडियाकडून न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा वनडे सामना खेळला होता. याच वर्षी त्याने कसोटीतील अखेरचा सामना खेळला. २०१७ मध्ये इंग्लंड विरुद्ध त्याने टी-२० च्या रुपात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. २५ वर्षांनी त्याने क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. सचिन तेंडुलकरने २०१३ मध्ये २४ वर्षांच्या कारकिर्दीनंतर क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली होती.

अमित मिश्राची कारकिर्द

  • कसोटीतील २२ सामन्यात ६४८ धावा आणि  ७६  विकेट्स
  • वनडेतील  ३६ सामन्यात ४३ धावा अन् ६४ विकेट्स
  • टी २० तील १० सामन्यात 0 धावा अन् १६ विकेट्स
  • आयपीएलमध्ये  १६२ सामन्यात ३८१  धावा अन् १७४ विकेट्स
     

Web Title: Amit Mishra Announces Retirement From All Forms Of Cricket Career 25 Years Longer Than Sachin Tendulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.