Join us

अमेरिकन रॅपर ड्रेक मालामाल! भारत-पाक वर्ल्ड कप सामन्यात सट्टात जिंकले ७ कोटी!!

Rapper Drake Betting IND vs PAK, T20 World Cup 2024: भारत-पाकिस्तान सामन्यासाठी ड्रेकने ५ कोटींचा सट्टा खेळला असल्याचे अहवालात म्हटले आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 17:18 IST

Open in App

Rapper Drake Betting IND vs PAK, T20 World Cup 2024 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने पाकिस्तानला १२० धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र बाबर आझमच्या संघाला २० षटकांत ७ बाद ११३ धावाच करता आल्या. या सामन्याची साऱ्यांनाच उत्सुकता होती. यावेळी ICCने नवीन प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी२० वर्ल्ड कपचे आयोजन केले आहे. तेथे सट्टा लावणे बेकायदेशीर नाही. त्यामुळेच कॅनेडियन रॅपर आणि गायक ड्रेकने भारतीय संघावर सट्टा लावला आणि त्यात त्याला मोठा फायदा झाल्याचे एका अहवालात सांगण्यात आले आहे.

अहवालातील माहिती आणि एका स्क्रीनशॉटनुसार, भारत-पाकिस्तान सामन्यावर ड्रेकने ६५० हजार अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे ५.४३ कोटी रूपयांचा सट्टा लावला होता. सामन्यात सुरुवातीला भारताची फलंदाजी फारशी चांगली झाली नाही. पण गोलंदाजांनी भारताच्या आशा जिवंत ठेवल्या. अखेर जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याने पाकिस्तानला विकेट्सचे धक्के देत भारताला सामना जिंकवून दिला. या विजयामुळे ड्रेकने लावलेला सट्टा फळला. त्याला ९१० हजार अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे ७.६० कोटी (७,६०,३९,१४५) रुपये मिळाले. म्हणजेच त्याला या सट्ट्यातून २.१६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, ड्रेकने क्रिकेट सामन्यावर सट्टा लावण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्याने इंडियन प्रीमियर लीग फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) वर सट्टा लावून ३.७३ कोटी कमावल्याचा दावा Mashable India ने केला आहे. ड्रेकने शाहरुख खानच्या टीमवर २५० हजार डॉलर्सचा सट्टा लावला होता. त्या सट्ट्यातून त्याने १.७ कोटींचा नफा कमावला होता, असे अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024अमेरिकाभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ