Join us  

.... तर IPL साठी देशांनी त्यांच्या खेळाडूंना पाठवू नये; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज कर्णधाराचे आवाहन

बीसीसीआय कोणत्याही परिस्थितीत आयपीएल खेळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 3:17 PM

Open in App

कोरोना व्हायरसच्या संकटात क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) तीन वेळा पुढे ढकलण्यात आली. परिस्थिती न सुधारल्यास यंदा आयपीएल स्पर्धा होणे अवघड वाटत आहे. त्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेवरही अनिश्चिततेचं सावट आहे. आयपीएल न झाल्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) 4000 कोटींची फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीसीसीआय कोणत्याही परिस्थितीत आयपीएल खेळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

त्यासाठी बीसीसीआयकडून सप्टेंबर-नोव्हेंबर या विंडोची चाचपणी केली जात आहे. आयपीएलसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी) ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित करण्याची चर्चा सुरू आहे. बीसीसीआय त्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा ऑस्ट्रेलियन मीडियानं केला आहे. या दाव्याचा संदर्भ घेत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अ‍ॅलन बॉर्डर यांनी बीसीसीआयवर टीका केली आहे.  

ते म्हणाले,''मला हे अजिबात पटलेलं नाही. एका स्थानिक स्पर्धेसाठी जागतिक स्पर्धा रद्द करणे, चुकीचे आहे. जर ट्वेंटी-20 वर्ल्ड कप होत नसेल, तर आयपीएलही होईल, असं मला वाटत नाही. ट्वेंटी-20 वर्ल्ड कपच्या जागी आयपीएल खेळवणे, हा पैशांसाठीचा अट्टाहास आहे, असं नाही का वाटत? ट्वेंटी-20 वर्ल्ड कपला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे.''

आयपीएलसाठी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा रद्द केल्यास, त्याचा जागतिक क्रिकेटमध्ये चुकीचं उदाहरण जाईल, असंही बॉर्डर यांना वाटतं. ते म्हणाले, जर असे झाल्यास अन्य देशांनी आणि त्यांच्या क्रिकेट संघटनांनी त्यांच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास पाठवू नये. ''

आयपीएल 2020साठी ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचा बळी? BCCI म्हणते...दरम्यान, बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल यांनी सांगितले की,''ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित करावा, असा सल्ला बीसीसीआय का देईल? आम्ही बैठकीत चर्चा केली आणि जे काही योग्य आहे त्याबाबत आयसीसी निर्णय घेईल. ऑस्ट्रेलिया सरकार आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांना ही स्पर्धा होईल असा आत्मविश्वास वाटत असेल, तर ते निर्णय घेतील. बीसीसीआय त्यांना काही सल्ला देणार नाही.'' 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

... तर सचिनने 1.30 लाख धावा केल्या असत्या; विराटची त्याच्याशी तुलना चुकीची - शोएब अख्तर 

टीम इंडियाच्या गोलंदाजाच्या बहिणीचा भोजपुरी गाण्यावर डान्स, Video Viral 

Cricket is Back; कॅरेबियन बेटावर आजपासून दहा दिवस रंगणार क्रिकेटचा थरार!

सुरेश रैना पाठोपाठ भारताच्या सलामीवीरानं मागितली परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी

आयपीएल 2020साठी ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचा बळी? BCCI म्हणते...

Video : सहा वर्षाच्या पोरानं जगाला याड लावलंय; सिक्स पॅक अन् फुटबॉलला 3000 पेक्षा अधिक किक

टॅग्स :आयपीएल 2020आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020आॅस्ट्रेलिया