Video : सहा वर्षाच्या पोरानं जगाला याड लावलंय; सिक्स पॅक अन् फुटबॉलला 3000 पेक्षा अधिक किक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 02:08 PM2020-05-22T14:08:21+5:302020-05-22T14:08:51+5:30

ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्यात जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू कोण? हा कधी न संपणारा वाद, दोन दिग्गजांच्या निवृत्तीनंतरही कायम ...

Video : Arat Hosseini, 6, shows off shock six-pack and completes 3,000 keepy-ups svg | Video : सहा वर्षाच्या पोरानं जगाला याड लावलंय; सिक्स पॅक अन् फुटबॉलला 3000 पेक्षा अधिक किक

Video : सहा वर्षाच्या पोरानं जगाला याड लावलंय; सिक्स पॅक अन् फुटबॉलला 3000 पेक्षा अधिक किक

Next

ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्यात जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू कोण? हा कधी न संपणारा वाद, दोन दिग्गजांच्या निवृत्तीनंतरही कायम राहणारा आहे. पण, आज फुटबॉलप्रेमींना एका वेगळ्याच खेळाडूनं याड लावलं आहे आणि या खेळाडूचं वय अवघे सहा वर्ष आहे... आरात होसैनी असे या मुलाचं नाव आहे. बार्सिलोनाचा स्टार मेस्सीचा तो चाहता आहे आणि त्याचे फुटबॉल कौशल्य पाहून बार्सिलोना क्लबनेही आरातला ट्रेनिंग देण्याची तयारी दर्शवली आहे. पण, आरातचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहे.

सहा वर्षीय आरातच्या सिक्स पॅकनं तर जगाला वेड लावलं आहे. त्यानं शेअर केलेल्या व्हिडीओत तो फुटबॉलला हवेतच 3000 पेक्षा अधिक वेळा किक मारताना दिसत आहे. त्याला पुढचा लिओनेल मेस्सी बनायचे आहे. 2017मध्ये त्यानं 10 फुटांच्या भींतीवरून उडी मारतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्याच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला. आरातचे इंस्टाग्रामवर 4 मिलियन फॉलोअर्स आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

नशीबाचं चक्र फिरलं; आजारी वडिलांना घेऊन 1200 किमी प्रवास करणाऱ्या ज्योतीसाठी आनंदवार्ता

... तर सचिनने 1.30 लाख धावा केल्या असत्या; विराटची त्याच्याशी तुलना चुकीची - शोएब अख्तर 

टीम इंडियाच्या गोलंदाजाच्या बहिणीचा भोजपुरी गाण्यावर डान्स, Video Viral 

Cricket is Back; कॅरेबियन बेटावर आजपासून दहा दिवस रंगणार क्रिकेटचा थरार!

सुरेश रैना पाठोपाठ भारताच्या सलामीवीरानं मागितली परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी

आयपीएल 2020साठी ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचा बळी? BCCI म्हणते...

 

Web Title: Video : Arat Hosseini, 6, shows off shock six-pack and completes 3,000 keepy-ups svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.