आयपीएल 2020साठी ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचा बळी? BCCI म्हणते...

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित होण्याच्या मार्गावर आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 01:30 PM2020-05-22T13:30:06+5:302020-05-22T13:31:14+5:30

whatsapp join usJoin us
BCCI won't push for T20 World Cup postponement to open IPL Window svg | आयपीएल 2020साठी ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचा बळी? BCCI म्हणते...

आयपीएल 2020साठी ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचा बळी? BCCI म्हणते...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित होण्याच्या मार्गावर आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार होती, परंतु सद्यपरिस्थिती पाहता वर्ल्ड कप होण्याची शक्यता फार कमी दिसत आहे. पुढील आठवड्यात याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी) आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील आठवड्यात याबाबत बैठक होणार असून औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धा स्थगित होण्यामागे इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) कारणीभूत असल्याची चर्चा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही ( बीसीसीआय) सप्टेंबर-नोव्हेंबरमध्ये आयपीएल खेळवण्याच्या हालचाली सुरू केल्यामुळे या चर्चांना खतपाणी मिळालं आहे.

खरंच आयपीएलसाठी ट्वेंटी-20 स्पर्धा स्थगित केली जाईल का?
लॉकडाऊनमुळे आयपीएल स्पर्धा तीनवेळा पुढे ढकलण्यात आली. यंदा ही लीग न झाल्यास बीसीसीआयला 4000 कोटींचे नुकसान होणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थिती आयपीएल खेळवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. पण, त्यासाठी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित करावी, अशी आमची इच्छा नसल्याचे स्पष्ट मत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं रॉयटरशी बोलताना व्यक्त केलं. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित करण्यासाठी बीसीसीआय दबाव वापरत असल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियन मीडियानं प्रसिद्ध केले आहेत.

बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल यांनी सांगितले की,''ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित करावा, असा सल्ला बीसीसीआय का देईल? आम्ही बैठकीत चर्चा केली आणि जे काही योग्य आहे त्याबाबत आयसीसी निर्णय घेईल. ऑस्ट्रेलिया सरकार आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांना ही स्पर्धा होईल असा आत्मविश्वास वाटत असेल, तर ते निर्णय घेतील. बीसीसीआय त्यांना काही सल्ला देणार नाही.''

ही स्पर्धा झाल्यास प्रेक्षकांविना सामने खेळवावेत का? या प्रश्नावर धुमाल यांनी सांगितले की,''हे सर्व ऑस्ट्रेलिया सरकारवर अवलंबून आहे. प्रेक्षकांविना सामने खेळण्यात काही अर्थ आहे का? एवढी मोठी स्पर्धा क्रिकेट ऑस्ट्रेलिया अशी खेळवेल का?''
 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

नशीबाचं चक्र फिरलं; आजारी वडिलांना घेऊन 1200 किमी प्रवास करणाऱ्या ज्योतीसाठी आनंदवार्ता

... तर सचिनने 1.30 लाख धावा केल्या असत्या; विराटची त्याच्याशी तुलना चुकीची - शोएब अख्तर 

टीम इंडियाच्या गोलंदाजाच्या बहिणीचा भोजपुरी गाण्यावर डान्स, Video Viral 

Cricket is Back; कॅरेबियन बेटावर आजपासून दहा दिवस रंगणार क्रिकेटचा थरार!

सुरेश रैना पाठोपाठ भारताच्या सलामीवीरानं मागितली परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी

Web Title: BCCI won't push for T20 World Cup postponement to open IPL Window svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.