Join us

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू बलात्काराच्या आरोपात दोषी, पाच वर्षांचा कारावास

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू अ‍ॅलेक्स हेपबर्न बलात्कराच्या आरोपात दोषी ठरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 09:41 IST

Open in App

वॉर्सेस्टर : ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू अ‍ॅलेक्स हेपबर्न बलात्कराच्या आरोपात दोषी ठरला आहे. 23 वर्षीय हेपबर्न हा इंग्लिंड कौंटी क्रिकेटमध्ये वॉर्सेस्टरशायर क्लबचे प्रतिनिधित्व करतो. वॉर्सेस्ट क्राऊन न्यायालयात तब्बल 11 तास या प्रकरणाची सुनावणी झाली आणि त्यात हॅपबर्नला दोषी ठरवण्यात आले. 2013 मध्ये हेपबर्न इंग्लंडमध्ये क्रिकेट कारकीर्द घडवण्यासाठी आला होता. हेपबर्नला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

एप्रिल 2017 च्या या घटनेत नाइट आउट करताना पिडीत महिलेची आणि जो क्लार्क यांची एका बारमध्ये ओळख झाली.  त्यानंतर ती महिला क्लार्कसोबत त्याच्या फ्लॅटमध्ये गेली आणि दोघांनी सहमतीने शारीरिक संबंध केले. पिडीत महिलनेने क्लार्क समजून हॅपबर्न सोबत सेक्स केल्याचा दावा केला. क्लार्क थोड्या वेळाने बाथरूममध्ये गेला आणि त्यानंतर अंधाराचा फायदा उचलत हॅपबर्नने बलात्कार केला, असा आरोप महिलेने केला. जो क्लार्क व हॅपबर्न यांनी सेक्स गेमसाठी एक व्हॉट्सअप ग्रुपही तयार केल्याचे सुनावणी दरम्यान उघड झाले. 

टॅग्स :आॅस्ट्रेलियाबलात्कारगुन्हेगारी