Join us  

३६ धावांत गारद झालेला संघ ऑस्ट्रेलियाला कसा भारी पडला; खुद्द रहाणेनंच 'मास्टरप्लान' सांगितला

खरंतर रहाणे आणि कोहली या दोघांच्या व्यक्तिमत्वात खूप फरक आहे. शांत आणि संयमी रहाणेने अतिशय उत्कृष्टपणे भारतीय संघाचं नेतृत्व केलं. 

By मोरेश्वर येरम | Published: January 19, 2021 8:44 PM

Open in App

भारतीय संघाला अॅडलेड कसोटीत मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यात कोहलीही रजेवर गेला आणि अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर भारतीय संघाचं नेतृत्व सोपविण्यात आलं. अशा बिकट परिस्थितीवर आणि त्यानंतरही आलेल्या सर्व अडथळ्यांवर मात करुन भारतीय संघानं ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली. 

रहाणेला बाबांनी वीर बाजीप्रभूंची कथा मेसेज केली अन् भारतीय संघानं मालिका जिंकली!

संपूर्ण संघाच्या योगदानामुळे संघाचा कर्णधारही यशस्वी होत असतो, असं रहाणेने म्हटलं. खरंतर रहाणे आणि कोहली या दोघांच्या व्यक्तिमत्वात खूप फरक आहे. शांत आणि संयमी रहाणेने अतिशय उत्कृष्टपणे भारतीय संघाचं नेतृत्व केलं. 

रहाणेने नेमकं काय केलं?"अॅडलेड कसोटीमध्ये पदरी पडलेल्या पराभवाची संघात जास्त चर्चा होणार नाही याची मी काळजी घेतली. यामुळे संघात आत्मविश्वास कायम राखण्यात मदत झाली", असं अजिंक्य रहाणे मेलबर्न कसोटीतील विजयानंतर म्हणाला होता. 

दुखापतींमुळे भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडू बाहेर आहेत याबाबत रहाणेला विचारण्यात आलं असता "उपलब्ध परिस्थितींमध्ये संघर्ष करत राहणं आमचं कर्तव्य आहे आणि तेच करणं आमच्या हातात शिल्लक होतं", असं रहाणे म्हणाला. अजिंक्यच्या याच शांत आणि संयमी स्वभावाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. 

भारताच्या विजयानंतर ट्विटरवर राहुल द्रविडचीच हवा, फॅन्स म्हणतात...द्रविडच 'मालिकावीर'!

"अॅडलेड कसोटीनंतर वास्तवाला नाकारणं सोपं काम नव्हतं. आम्ही परिणामांबाबत जास्त विचार करतच नव्हतो. आम्हाला फक्त चांगलं क्रिकेट खेळायचं होतं. त्यामुळे या विजयाचं श्रेय संपूर्ण संघाला जातं", असं रहाणे म्हणाला. 

ऋषभ पंतनं विजयी चौकार लगावल्यानंतर रहाणे भावूक झाला होता. तो म्हणाला, "आपल्या सर्वांना या विजयाचा आनंद लुटायला हवा. केवळ संघानं नाही, तर प्रत्येक भारतीयानं यांचा आनंद घ्यायला हवा. आम्ही इथं जे केलंय ते ऐतिहासिक आहे आणि आज रात्री आम्ही याचंच सेलिब्रेशन करणार आहोत. भारतात परतल्यानंतर इंग्लंडच्या मालिकेबाबत विचार करू", असं प्रांजळपणे रहाणे सांगतो. ना कोरोनाचा बहाणा...ना स्लेजिंगचा हातखंडा...टीम इंडियानं असा रोवला विजयाचा झेंडा!

भारतीय संघाच्या आगामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचं नेतृत्व आता विराट कोहली करणार आहे. पण त्याच्यासोबतच रहाणे देखील संघात खेळताना दिसेल.  

टॅग्स :अजिंक्य रहाणेभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघविराट कोहलीआॅस्ट्रेलिया