Join us

खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल

Aiden Markram Kissed Wife WTC Final 2025: दमदार शतक ठोकणारा एडन मार्करम फायनलचा 'हिरो' ठरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 12:42 IST

Open in App

Aiden Markram Kissed Wife WTC Final 2025: विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्सने पराभव केला. मोठ्या स्पर्धांमध्ये आणि अनेकदा मोक्याच्या क्षणी मार खाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने अखेर स्वतःवरील 'चोकर्स' हा टॅग पुसून टाकला. दक्षिण आफ्रिकेने तब्बल २७ वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली. त्यामुळे संघातील खेळाडूंनी खास पद्धतीने आनंद साजरा केला. सामन्यात झंझावाती शतक ठोकणारा आणि सामनवीराचा किताब जिंकणारा एडन मार्करम याने तर खास पद्धतीने विजय साजरा केला. यावेळी त्याने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला किस करून आलिंगन दिले आणि तिच्याकडून शुभेच्छा स्वीकारल्या.

एडन मार्करमने सर्वात अनोख्या पद्धतीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजय साजरा केला. आयसीसी ट्रॉफी जिंकल्याच्या आनंदात तो चाहत्यांकडे गेला, जिथे त्याने बिअरचा मग अख्खा पिऊन टाकला. मार्करामची पत्नी निकोल डॅनियल ही देखील मैदानावर आली. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या ऐतिहासिक विजयानंतर मार्करमने आपल्या पत्नीला मिठी मारली आणि हजारो चाहत्यांसमोर तिचे चुंबन घेत विजयाचा आनंद साजरा केला. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

----

दरम्यान, पहिल्या डावात झीरो ठरल्यानंतर दुसऱ्या डावात शतकी खेळी करत मार्करम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील फायनलचा हिरो ठरला. शतकी खेळीसह त्याने खास विक्रमालाही गवसणी घातली. त्याच्या रुपाने २९ वर्षानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध एखाद्या फलंदाजाने आयसीसीच्या फायनलमध्ये शतकी खेळी केल्याचे पाहायला मिळाले. २१ व्या शतकात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच शतकवीर ठरला. याआधी १९९६ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकन दिग्गज अरविंद डिसिल्वा याने आयसीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक झळकावले होते.

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाद. आफ्रिकाव्हायरल फोटोज्आॅस्ट्रेलिया