Join us

SA Won WTC Final 2025 : एडन मार्करमचे धमाकेदार शतक!! द. आफ्रिकेने रचला इतिहास; कांगारुंना हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी

Aiden Markram Century Temba Bavuma, SA vs AUS WTC Final 2025: आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला ५ गडी राखून केलं पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 17:33 IST

Open in App

Aiden Markram Century Temba Bavuma, SA vs AUS WTC Final 2025: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत २७ वर्षांनी पहिल्यांदाच ICC स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. २८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर एडन मार्करमचे धडाकेबाज शतक (१३६) आणि कर्णधार टेम्बा बवुमाचे झुंजार अर्धशतक (६६) यांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने कांगारुंचा ५ गडी राखून पराभव केला. या विजयासह कर्णधार बवुमाने एकही कसोटी सामना न रहण्याचा आपला विक्रम कायम राखला. तसेच दक्षिण आफ्रिकेने १९९८ मध्ये त्यांचे एकमेव आयसीसी जेतेपद जिंकले होते. त्यानंतर २७ वर्षांचा दुष्काळ संपवत आफ्रिकेने ICC ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

मार्करम-बवुमा जोडीने मारली बाजी

पहिल्या डावा ऑस्ट्रेलियाने २१२ तर आफ्रिकेने केवळ १३८ धावा केल्या होत्या. तिसऱ्या डावात मिचेल स्टार्कच्या झुंजार अर्धशतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने २०७ धावा केल्या आणि आफ्रिकेला २८२ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना रायन रिकल्टन (६) आणि वियान मुल्डर (२७) झटपट बाद झाले. त्यानंतर एडन मार्करम आणि टेम्बा बवुमा जोडीने मैदानात पाय रोवले आणि कांगारुंची गोलंदाजी झोडपून काढली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १४७ धावांची भागीदारी केली. बवुमा दुखापतग्रस्त झाला असूनही त्याने ५ चौकारांसह ६६ धावांची दमदार खेळी केली.

एडन मार्करमचे झंझावाती शतक

चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होताच टेम्बा बवुमा बाद झाला, पण एडन मार्करमने एक बाजू लावून धरली. मार्करमने संयमी खेळी करत २०७ चेंडूंचा सामना करत १३६ धावांची विक्रमी खेळी केली. मार्करमने आपल्या दमदार खेळीत कसोटी क्रिकेटला साजेशी फटकेबाजी केली. त्याने एकही चेंडू बेजबाबदारपणे हवेत खेळला नाही. १४ चौकारांच्या फटकेबाजीने मार्करमने आपली खेळी सजवली. विजयाला अवघ्या १० धावा शिल्लक असताना मार्करम बाद झाला.

अखेर डेव्हिड बेडिंगहॅमने (नाबाद २१) चौकार लगावत आफ्रिकेला विजेतेपद मिळवून दिले.

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाद. आफ्रिकाआॅस्ट्रेलिया