Join us

आरसीबीवरील विजयानंतर सुर्यकुमारचे सेलिब्रेशन झाले सोशल मीडियावर व्हायरल

दिवसभर ट्विटरवर, इन्स्टाग्राम या सारख्या सोशल मिडिया साईट्सवर अनेक मिम्स व्हायरल होत होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 17:55 IST

Open in App

रॉयल चँलेजर्स बंगलुरू विरोधातील मुंबई इंडियन्सचा फलंदाज सुर्यकुमार यादव चे सेलिब्रेशन सोशल मिडियात चांगलेच व्हायरल झाले आहे.यादव याने ४३ चेंडूत ७९ धावा केल्या. त्यानंतर सुर्यकुमार यादव याने खुणेनेच सांगितले की ‘निश्चींत रहा मी आहे.’ त्याचा हा अंदाज सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होता आहे.

दिवसभर ट्विटरवर, इन्स्टाग्राम या सारख्या सोशल मिडिया साईट्सवर अनेक मिम्स व्हायरल होत होते. या सामन्याच्या दरम्यान आरसीबीचा कर्णधार विराट कोहली याने देखील ३० वर्षांच्या सुर्यकुमार यादवला स्लेजिंग केले होते. तसेच ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेत यादवची निवड झालेली नाही. त्यामुळे आधीच सोशल मिडिया युजर आणि क्रिकेट दिग्गज त्याच्या बाजुने बोलत होते. अशात त्याने एकही शब्द न काढता शानदार खेळी करत मुंबईला विजय मिळवून दिला. तसेच अर्धशतकानंतर सेलिब्रेशन करतानाही ‘मी आहे.’ अशी खुण केल्याने त्याचे कौतुक होत आहे.त्याने शब्दांऐवजी बॅटने उत्तर दिल्याचे नेटिझन्सनी म्हटले आहे.

टॅग्स :मुंबई इंडियन्सIPL 2020सोशल मीडिया