Join us

वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

आयपीएल 2025 मध्ये 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी गुजरात टायटन्सविरोधात शतक झळकावून चर्चेत आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 19:25 IST

Open in App

IPL 2025 मध्ये दररोज नवनवीन विक्रम प्रस्थापित होत आहेत. काही दिवसांपूर्वीच बिहारच्या समस्तीपूरचा तरुण क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी खूप चर्चेत आला होता. 14 वर्षीय वैभव हा आयपीएलमध्ये खेळणारा सर्वात तरुण खेळाडू तर आहेच, शिवाय तो या लीगमध्ये शतक झळकावणाराही सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. त्याने अलीकडेच गुजरात टायटन्सविरुद्ध फक्त 35 चेंडूत शतक झळकावले होते. दरम्यान, आता आणखी एका 14 वर्षीय खेळाडूने क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले आहे.

14 वर्षीय खेळाडूचे द्विशतकबीसीसीआय अंडर-14 राज सिंग डुंगरपूर सेंट्रल झोन ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या एका 14 वर्षीय खेळाडूने चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना उत्तर प्रदेश आणि विदर्भ या संघांमध्ये खेळला गेला, ज्यात उत्तर प्रदेशने विजेतेपद जिंकले. उत्तर प्रदेशच्या या विजयाचा नायक 14 वर्षीय तरुण क्रिकेटपटू मोहम्मद कैफ होता. त्याने अंतिम सामन्यात द्विशतक झळकावून आपल्या संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.

राज सिंग डुंगरपूर सेंट्रल झोन ट्रॉफीचा अंतिम सामना 3 मे ते 5 मे दरम्यान खेळवण्यात आला. या सामन्यात यूपी संघाने प्रथम फलंदाजी करत 103 षटकांत नऊ गडी बाद 502 धावा करून डाव घोषित केला. यादरम्यान, मोहम्मद कैफने 280 चेंडूत 250 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या खेळीत 19 चौकार आणि 12 षटकारांचा समावेश होता. दरम्यान, विदर्भाचा पहिला डाव 64.2 षटकांत 194 धावांवर संपुष्टात आला. विदर्भाकडून कर्णधार मल्हार मनोजने सर्वाधिक 132 धावा केल्या.

मोहम्मद कैफचे वडील मजुरी करतात....दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, मोहम्मद कैफचे वडील मुन्ना मजूर म्हणून काम करतात. मोहम्मद कैफ 7 भावंडांमध्ये सर्वात लहान आहे. त्याने वयाच्या 7 व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. कानपूरमध्ये नुकत्याच झालेल्या चाचणीद्वारे त्याची यूपीच्या अंडर-14 संघात निवड झाली आहे. या खेळीनंतर कैफ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

टॅग्स :आयपीएल २०२४सोशल मीडियाउत्तर प्रदेश