ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर युवा खेळाडूंच्या जोरावर टीम इंडियानं ऐतिहासिक मालिका विजय मिळवला. ०-१ अशा पिछाडीवरून टीम इंडियानं मुसंडी मारताना चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. या विजयानंतर महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा ( Anand Mahindra) यांनी टीम इंडियातील ६ युवा खेळाडूंना नवी कोरी महिंद्रा थार ( Mahindra Thar ) गिफ्ट करण्याचे जाहीर केले. या मालिकेत मोहम्मद सिराज, टी नटराजन, शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, शुबमन गिल आणि नवदीप सैनी यांना ही गाडी मिळणार आहे. गुरुवारी टी नटराजनच्या घरी लाल रंगाची ( T Natarajan) महिंद्रा थार दाखल झाली. शार्दूल ठाकूरच्या ( Shardul Thakur) घरीही गुरुवारी ही गाडी दाखल झाली. IPL 2021त न खेळताही श्रेयस अय्यर कमावणार ७ कोटी, जाणून घ्या काय आहे Players Insurance scheme!
शार्दूलनं ब्रिस्बेन कसोटीत वॉशिंग्टन सूंदरसह चिवट खेळी करताना ६७ धावा चोपल्या आणि त्याच सामन्यात त्यानं ७ विकेट्सही घेतल्या होत्या. शार्दूल ठाकूरनं ट्विट करून ही माहिती दिली. तो म्हणाला,'' आनंद महिंद्रा तुमचे खूप खूप आभार. ही खरंच बिस्ट आहे आणि ही गाडी चालवून आनंद झाला. देशातील युवा खेळाडूंप्रती तुम्ही दाखवलेलं प्रेम प्रेरणादायी आहे. पुन्हा एकदा आभार.''
टी नटराजननं दिलं रिटर्न गिफ्ट"भारतासाठी क्रिकेट खेळणं माझ्यासाठी ऐतिहासिक क्षण होता. या रस्त्यावरुन पुढे जाणं माझ्यासाठी खरंच खूप वेगळं आहे. या प्रवासात मला जे प्रेम आणि आपलेपणा मिळाला त्याची अनुभूती घेऊन मला खूप आनंद होत आहे. लोकांनी दिलेलं समर्थन आणि आत्मविश्वास दिल्यामुळे मला पुढे जाण्यास मदत मिळाली", असं ट्विट टी.नटराजन यानं केलं आहे. नटराजननं रिटर्न गिफ्ट म्हणून गॅबा कसोटीतील ऐतिहासिक विजयाच्या जर्सीवर स्वाक्षरी देऊन पाठवली.