IPL 2021: Delhi Capital’s Shreyas Iyer to get full salary of Rs 7 Cr despite not playing IPL 2021 | Shreyas Iyer : IPL 2021त न खेळताही श्रेयस अय्यर कमावणार ७ कोटी, जाणून घ्या काय आहे Players Insurance scheme!

Shreyas Iyer : IPL 2021त न खेळताही श्रेयस अय्यर कमावणार ७ कोटी, जाणून घ्या काय आहे Players Insurance scheme!

ठळक मुद्देभारत- इंग्लंड वन डे मालिकेत श्रेयस अय्यरला झाली होती दुखापत८ एप्रिलला त्याच्या खांद्यावर होणार शस्त्रक्रीया

Indian Premier League 2021 : आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाला ( Delhi Capitals) मोठा धक्का बसला. भारत-इंग्लंड ( India vs England) मालिकेत श्रेयस अय्यरच्या ( Shreyas Iyer) खांद्याला दुखापत झाली आणि त्याला मालिकेसोबतच आयपीएल २०२१मधून माघार घ्यावी लागली. आयपीएलच्या १४व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वीच कर्णधारानं माघार घेतल्याचा धक्का दिल्ली कॅपिटल्सला ( DC) सहन करावा लागला. अय्यरच्या अनुपस्थितीत DC चे नेतृत्व आता रिषभ पंत ( Rishabh Pant) करणार आहे.  विराट कोहली Vs BCCI; कर्णधारानं व्यग्र वेळापत्रकावरून व्यक्त केली नाराजी, बोर्डाकडून मिळालं रोखठोक उत्तर

श्रेयस अय्यरवर ८ एप्रिलला सर्जरी केली जाणार आहे. श्रेयस आयपीएल २०२१त खेळणार नसला तरी त्याला Players Insurance scheme अंतर्गत प्रती पर्वानुसार यंदाही ७ कोटी रुपये मिळणार आहेत. BCCIच्या करारबद्ध खेळाडूंसाठी ही इन्शुरन्स पॉलिसी आहे. २०११मध्ये BCCI सचिव एन श्रीनिवासन व भारतीय खेळाडूंत झालेल्या चर्चेनंतर ही पॉलिसी आणली गेली. या पॉलिसीनुसार खेळाडूला दुखापतीमुळे/अपघातामुळे आयपीएलमध्ये खेळता न आल्यास त्यांना भरपाई दिली जाणार आहे.  IPL 2021 : चेतेश्वर पुजारामुळे जोश हेझलवूडनं घेतली माघार?; जाणून घ्या काय खरं, काय खोटं!

श्रेयस अय्यर पात्र ठरतो की नाही? (  How is Shreyas Iyer eligible?)
राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करताना खेळाडूला दुखापत झाल आणि त्याला आयपीएलला पूर्णतः किंवा अंशतः मुकावे लागते, तर तो या भरपाईसाठी पात्र ठरतो. भारत-इंग्लंड मालिकेसाठी निवडलेल्या वन डे संघात अय्यरचा समावेश होता आणि क्षेत्ररक्षण करताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. बीसीसीआयच्या करारामध्ये असलेल्या खेळाडूंसाठीच ही पॉलिसी आहे.   

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021: Delhi Capital’s Shreyas Iyer to get full salary of Rs 7 Cr despite not playing IPL 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.