Duleep Trophy 2025, South Zone vs North Zone1st Semi-Final N Jagadeesan Century : इंग्लंड दौऱ्यावर BCCI नं पंतच्या जागी भारतीय संघात 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री उगाच दिली नव्हती, हे एन जगदीशन याने शतकी खेळीसह दाखवून दिलं आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील दुलीप करंडक स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलमध्ये केरळकर मोहम्मद अझरुद्धीनच्या नेकृत्वाखालील दक्षिण विभागाकडून खेळताना जगदीशन याने कडक खेळीसह पहिला दिवस गाजवला. बंगळुरु येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्सच्या मैदानात रंगलेल्या उत्तर विभाग संघाविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात त्याने शतक तर पूर्ण केलेच. पण दिवसाअखेर नाबाद परतत संघाला मजबूत स्थितीत नेऊन ठेवले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोघांसोबत शतकी भागीदारी, दिवसाअखेर पठ्ठ्या १४८ धावांवर नाबाद परतला
पहिल्या सेमीफायनलमध्ये उत्तर विभाग संघाने नाणेफेक जिंकून दक्षिण विभागाला फलंदाजीसाठी निमंत्रित केले. त्यांचा हा निर्णय व्यर्थ ठरवत विकेट किपर बॅटरनं जगदीशन याने तन्मय अग्रवालच्या साथीनं आपल्या संघाला दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. १०३ धावांवर तन्मय ४३ धावांवर माघारी फिरला. मग जगदीशन याने देवदत्त पडीक्कलच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी आणखी एक शतकी भागीदारी करत उत्तर विभाग संघाच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. देवदत्त पडिक्कल ७१ चेंडूत ५७ धावा करून बाद झाला. पण जगदीशन दिवसाअखेर नाबाद राहिला. त्याने पहिल्या दिवसाअखेर २६० चेंडूचा सामना करताना १३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १४८ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर दक्षिण विभाग संघाने पहिल्या दिवसाच्या खेळात ३ बाद २९७ धावा केल्या आहेत.
Ruturaj Gaikwad Century: बंगळुरुच्या मैदानात पुणेकराची हवा; सेंच्युरीसह ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
इंग्लंड दौऱ्यावर पंतच्या जागी अचानक झाली होती टीम इंडियात एन्ट्री
शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघात एन जगदीशनला अचानक वर्णी लागली होती. इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातून दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झालेल्या रिषभ पंतच्या जागी एन जगदीशन याला संघात स्थान मिळाले होते. अखेरच्या कसोटी सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्य संधी मिळाली नव्हती. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधून परतल्यावर महिन्याभरात त्याने कडक खेळीसह आपल्यातील धमक दाखवून दिलीये. वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी त्याने टीम इंडियातील विकेट किपर बॅटरच्या शर्यतीत आपणही आहोत, हेच या खेळीतून दाखवून दिले आहे.
Web Title: After Maiden Test call up N Jagadeesan Lights Up Duleep Trophy With Sensational Ton South Zone vs North Zone1st Semi-Final
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.