Join us

पराभवानंतरही इंग्लंडच्या क्रिकेट संघाचे सेलिब्रेशन

राभूत झाल्यावरही इंग्लंडच्या संघाने सेलिब्रेशन केलं, असं तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 19:26 IST

Open in App
ठळक मुद्देइंग्लंडच्या एका खेळाडूनेच या गोष्टीचा पुरावा दिला आहे.

लंडन : पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीत इंग्लंडला भारताकडून पराभूत व्हावे लागले. पण पराभूत झाल्यावरही इंग्लंडच्या संघाने सेलिब्रेशन केलं, असं तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण इंग्लंडच्या एका खेळाडूनेच या गोष्टीचा पुरावा दिला आहे. 

भारताच्या कुलदीप यादव आणि लोकेश राहुल यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. या दोघांच्या कामगिरीच्या जोरावर भारताला इंग्लंडवर सहज विजय मिळवता आला. पण पराभूत झाल्यावरदेखील इंग्लंडने सेलिब्रेशन नेमकं कसलं केलं, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण इंग्लंडच्या जोस बटलरने इंस्टाग्रावर एक व्हीडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये इंग्लंडचे क्रिकेटपटू आनंद साजरा करताना दिसत आहेत.

इंग्लंडचा क्रिकेटचा सामना संपला. त्यानंतर इंग्लंडच्या फुटबॉल संघाचा रशियातील विश्वचषकात सामना सुरु होता. या सामन्यात इंग्लंडने पेनेल्टी शूआऊटमध्ये ४-३ अशा फरकाने विजय मिळवला. इंग्लंडकडून जेव्हा चौथा आणि निर्णायक गोल मारण्यात आला तेव्हा इंग्लंडच्या संघाने ड्रेसिंग रुममध्ये आनंद साजरा केला. हे क्षण बटलरने टिपले आणि त्याचा व्हीडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

टॅग्स :इंग्लंड विरुद्ध भारतभारतक्रिकेटइंग्लंड