Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!

पॉवर प्लेमध्ये अफगाणिस्तानच्या संघानं स्वस्तात गमावल्या २ विकेट्स, मग अटल खेळीमुळं सावरला डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 22:06 IST2025-09-09T21:53:47+5:302025-09-09T22:06:20+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Afghanistan vs Hong Kong 1st Match Sediqullah Atal brings up the First Fifty of Asia Cup 2025 Azmatullah Omarzai Also Hit Half Century With 250 Plus Strike Rate | Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!

Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!

Asia Cup 2025, Afghanistan vs Hong Kong 1st Match Sediqullah Atal : आशिया कप स्पर्धेतील हाँगकाँग विरुद्धच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान याने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्याचा हा निर्णय आशिया कप स्पर्धेत एकही सामना न जिंकणाऱ्या हाँगकाँगच्या संघातील गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

पॉवर प्लेमध्ये अफगाणिस्तानच्या संघानं स्वस्तात गमावल्या २ विकेट्स, मग अटलची दमदार फिफ्टी

रहमानुल्ला गुरबाझ (Rahmanullah Gurbaz) ८ (५) आणि इब्राहिम झदरान (Ibrahim Zadran) या दोघांनी पॉवर प्लेमध्ये नांगी टाकली अन् अफगाणिस्तानच्या संघाची अवस्था २ बाद २६ अशी बिकट झाली. संघ अडचणीत असताना सलामीवीर सेदीकुल्लाह अटल (Sediqullah Atal) याने आश्वासक खेळी करत संघाचा डाव सावरला. एवढेच नाही तर पहिल्या नंबरला येऊन यंदाच्या हंगामात पहिले अर्धशतक ठोकण्याचा डाव या पठ्ठ्यानं साधला. आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील त्याचे हे तिसरे अर्धशतक ठरले.

IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)

अझमतुल्लाह ओमरझाईच्या भात्यातून आली वादळी फिफ्टी

संघ अडचणीत असताना सेदीकुल्लाह अटल याने मोहम्मद नबीसोबत डावाला आकार दिला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर अखेरच्या षटकात अझमतुल्लाह ओमरझाईनं त्याला उत्तम साथ देत अर्धशतक झळकावले. त्याने फक्त २१ चेंडूत ५ षटकार आणि २ चौकाराच्या मदतीने २५२ च्या स्ट्राइक रेटसह ५३ धावांची खेळी केली. अफगाणिस्तानच्या सलामीवीरानं ओमरझाईच्या साथीन पाचव्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी रचली. शेवटपर्यंत नाबाद राहिलेल्या अटलनं ५२ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने केलेल्या ७३ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर सुरुवातीला अडखळलेल्या अफगाणिस्तानच्या संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात १८८ धावा केल्या. 

Web Title: Afghanistan vs Hong Kong 1st Match Sediqullah Atal brings up the First Fifty of Asia Cup 2025 Azmatullah Omarzai Also Hit Half Century With 250 Plus Strike Rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.