Afghanistan vs Hong Kong, 1st Match, Group B : अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग यांच्यातील लढतीनं आशिया चषक टी-२० स्पर्धेला सुरुवात होत आहे. ९ सप्टेंबर रोजी अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर हे दोन्ही संघ समोरासमोर येणार आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री ८ वाजता सुरु होईल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आशिया चषक स्पर्धेत दोन्ही संघातील पहिली लढत
आशिया चषक स्पर्धेत पहिल्यांदाच हे दोन संघ एकेमकांविरुद्ध भिडणार असले तरी याआधी दोन्ही संघात मोजके सामने खेळवण्यात आले आहेत. एक नजर टाकुयात याआधी किती वेळा दोन्ही संघात झालाय टी-२० सामना? कोण ठरलंय भारी अन् आशिया चषक स्पर्धेतील लढतीत दोन्ही संघातील कोणत्या खेळाडूवर असतील सर्वांच्या नजरा यासंदर्भातील सविस्तर माहिती
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
अफगाणिस्तानचा संघ 'लिंबू टिंबू' गटातून बाहेर पडलाय, पण...
लिंबू टिंबू गटातून बाहेर पडून 'चमत्कारी' संघ (बलाढ्य संघाला शह देण्याची कमाल) अर्थात अफगाणिस्तान आता अधिक सक्षम झाला आहे. त्यामुळे या सामन्यात राशिद खानच्या नेतृत्वाखालील संघाचे पारडेच जड आहे. पण हाँगकाँगच्या संघाला कमी लेखण्याची चूक ते करणार नाहीत. कारण या संघाने दोन वेळा त्यांना पराभूत केल्याचा इतिहास आहे. हाच चमत्कार ते पुनरावृत्ती दिसणार की, अफगाणिस्तान एकहाती सामना जिंकणार? ते पाहण्याजोगे असेल.
दोन्ही संघातील पहिला अन् शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना कधी खेळवण्यात आलाय?
आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात आतापर्यंत ६ सामने खेळवण्यात आले आहेत. यातील ४ सामन्यात अफगाणिस्तान संघाने बाजी मारलीये. दुसरीकडे दोन वेळा हाँगकाँगनं या संघाला पराभवाचा धक्का दिलाय. २०१२ मध्ये या दोन्ही संघात पहिला आंतरारष्ट्रीय टी-२० सामना खेळवण्यात आला होता. यूएईतील शारजाच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने ९ विकेट्स राखून एकहाती विजय नोंदवला होता. २०१६ मध्ये नागपूरच्या मैदानात हे दोन संघ शेवटचा टी-२० सामना खेळले. त्यावेळीही अफगाणिस्तानच्या संघाने बाजी मारली होती.
सामन्याची तारीख | सामन्याचे ठिकाण | सामन्याचा निकाल |
---|
१८ मार्च २०१२ | शारजा, संयुक्त अरब अमिराती | अफगाणिस्तान ९ गडी राखून विजयी |
१७ मार्च २०१४ | चट्टोग्राम, बांगलादेश | अफगाणिस्तान १ धावांनी विजयी |
२० जुलै २०१५ | डब्लिन, आयर्लंड | हाँगकाँगने ५ गडी राखून विजयी |
२७ नोव्हेंबर २०१५ | अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती | हाँगकाँगने ४ गडी राखून विजयी |
२१ फेब्रुवारी २०१६ | ढाका, बांगलादेश | अफगाणिस्तान ६६ धावांनी विजयी |
१० मार्च २०१६ | नागपूर, भारत | अफगाणिस्तान ३ धावांनी विजयी |
दोन्ही संघातील या खेळाडूंवर असतील नजरा
अफगाणिस्तानच्या ताफ्यातून कर्णधार राशिद खानसह मोहम्मद नबी आणि रहमानउल्ला गुरबाझसारख्या स्टार खेळाडूकडून लक्षवेधी कामगिरीची अपेक्षा आहे. दुसरीकडे हाँगकाँग संघाला चमत्कार करायचा असेल तर यासीम मुर्तझा, बाबर हयात आणि झीशान अली यांना धमक दाखवावी लागेल.
Web Title: Afghanistan vs Hong Kong 1st Match Afghanistan vs Hong Kong Head to Head T20 Stats And Records
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.