Afghanistan Squad For T20 World Cup 2026 : भारत आणि श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी अफगाणिस्तानने आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. अफगाणिस्तानच्या संघाचे नेतृत्व स्टार लेगस्पिनर राशिद खान करणार असून, सलामीवीर इब्राहिम झादरान याच्याकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अफगाणिस्तानचा संघ 'डेथ ग्रुप'मध्ये 'चमत्कार' दाखवण्यासाठी सज्ज
२०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तानने अप्रतिम कामगिरी करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती, त्यामुळे यंदाही संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यंदाच्या स्पर्धेत हा संघ 'डेथ ग्रुप'मध्ये आहे. करामती खानच्या नेतृत्वाखालील चमत्कार दाखवण्यासाठी अफगाणिस्तानच्या संघात कोण कोणत्या खेळाडूंना मिळाली आहे संधी जाणून घेऊयात सविस्तर
काव्या मारनने IPL लिलावात दिले १३ कोटी…आणि इंग्लंडने त्यालाच T20 वर्ल्ड कप संघातून बाहेर काढलं!
अनुभवी नवीन उल हकची अफगाणिस्तानच्या संघात पुनरागमन
41 वर्षीय अनुभवी अष्टपैलू मोहम्मद नबी पुन्हा एकदा संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. त्यांच्यासोबतच गुलबदीन नायब आणि नवीन-उल-हक यांचेही संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे अफगाणिस्तानची गोलंदाजी अधिक भक्कम झाली आहे. नवीन-उल-हक २०२५ या कॅलेंडर ईयरमध्ये अफगाणिस्तानकडून एकही सामना खेळलेला नव्हता. दुखापतीमुळे तो आशिया कपलाही मुकला होता. मात्र मागील टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने प्रभावी कामगिरी केली होती. याच कामगिरीच्या जोरावर त्याला आगामी मोठ्या स्पर्धेसाठी पुन्हा संघात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय अब्दुल्ला अहमदजई आणि फजलहक फारूकी हे वेगवान गोलंदाजही संघात आहेत. फजलहक फारूकी याने २०२४ च्या गत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत संयुक्तपणे सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. अल्लाह गजनफरला राखीवमध्ये स्थान देण्यात आले आहे. त्याच्यासोबत इजाज अहमदजई आणि जिया उर रहमान शरीफी हेही राखीव खेळाडू असतील.
अफगाणिस्तानचा संघ न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीनं करणारा वर्ल्ड कपच्या मोहिमेची सुरुवात
टी-२० वर्ल्ड कपआधी अफगाणिस्तानचा संघ वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. ही मालिका १९ ते २२ जानेवारीदरम्यान शारजाह येथे होणार असून, याच संघासह ही मालिका खेळली जाणार आहे. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तानचा समावेश 'ड' गटात मध्ये करण्यात आला आहे. या गटात न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, यूएई आणि कॅनडा हे संघ आहेत. दोन बलाढ्य संघ असल्यामुळे अफगाणिस्तानसाठी हा डेट ग्रुप मानला जात आहे. अफगाणिस्तान आपला पहिला सामना ८ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे न्यूझीलंडविरुद्ध खेळेल. त्यानंतर ११ फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना होणार आहे.
टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी अफगाणिस्तानचा संघ
राशिद खान (कर्णधार), इब्राहिम झादरान (उपकर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), मोहम्मद इशाक (यष्टीरक्षक), सेदिकुल्लाह अटल, दरविश रसूली, शाहिदुल्लाह कमाल, अजमतुल्लाह उमरजई, गुलबदीन नायब, मोहम्मद नबी, नूर अहमद, मुजीब उर रहमान, नवीन उल हक, फजलहक फारूकी, अब्दुल्ला अहमदजई.