अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव

पाचव्यांदा आशिया कप स्पर्धेत खेळताना सलग १२ वा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 00:19 IST2025-09-10T00:12:28+5:302025-09-10T00:19:50+5:30

whatsapp join usJoin us
AFG vs HKG Asia Cup 2025 Afghanistan Opens Campaign With 94 Run Win Over Hong Kong They Have Not Won A Single Game In 12 Appearances | अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव

अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Afghanistan vs Hong Kong, 1st Match : यूएईतील अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर रंगलेल्या आशिया कप स्पर्धेतील सलामीच्या लढतीत अफगाणिस्तानच्या संघाने मोठा विजय मिळवत विजयी सलामी दिलीये. पहिल्यांदा फलंदाजी करताना अफगाणिस्तानच्या संघाने सलामीवीर सेदीकुल्ला अटल (Sediqullah Atal) च्या नाबाद अर्धशतकी खेळीसह अझमतुल्लाह ओमरझाई (Azmatullah Omarzai) याने टी-२० कारकिर्दीत केलेल्या पहिल्या आणि विक्रमी अर्धशतकाच्या जोरावर अफगाणिस्तानच्या संघाने निर्धारित २० षटकात ६ बाद १८८ धावा करत हाँगकाँगच्या संघासमोर १८९ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना हाँगकाँगचा संघ शंभरीपर्यंतही पोहचू शकला नाही. या पराभवासह आशिया कप स्पर्धेत खाते उघडण्यात हा संघ पुन्हा एकदा अपयशी ठरलाय.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

फक्त दोघांनी गाठला दुहेरी आकडा; जेवढ्या धावा केल्या तेवढ्या धावांनी पराभव 

अफगाणिस्तानच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना हाँगकाँगच्या संघाने पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर पहिली विकेट गमावली.  अर्धशतकवीर ओमरझाईनं सलामीवीर अंशुमन रथला खातेही उघडू दिले नाही. त्याच्या पदरी गोल्डन डकची नामुष्की ओढावी. बाबर हयातनं ४३  चेंडूंत  ३ षटकाराच्या मदतीने केलेल्या ३९ धावा आणि कर्णधार यासिम मुर्तझा याने २६ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने केलेली १६ धावांची खेळी वगळता हाँगकाँगच्या संघातील अन्य एकाहीी फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. परिणामी १८९ धावांचा पाठलाग करताना संघ निर्धारित २० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात ९४ धावांपर्यंत मजल मारू शकला. अफगाणिस्तानच्या संघाने अपेक्षेप्रमाणे पहिला सामना ९४ धावांनी जिंकला. 

Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला

पाचव्यांदा आशिया कप स्पर्धा खेळताना पदरी पडला १२ वा पराभव

आशिया कप स्पर्धेतील आतापर्यंतच्या इतिहासात पाचव्यांदा हाँगकाँगचा संघ आशिया कप स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. २००४ मध्ये पहिल्यांदा या स्पर्धेत सहभाग घेतला. २००८ नंतर चार हंगामात अपात्र ठरल्यावर २०१८ आणि २०२२ मध्ये त्यांनी या स्पर्धेत पुन्हा एन्ट्री मारली. ११ सामन्यात प्रत्येकवेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यात आता २०२५ च्या हंगामातील सलामीच्या सामन्यात त्यांच्या पदरी सलग १२ व्या पराभवाची नोंद झाली आहे. हाँगकाँगशिवाय फक्त नेपाळचा संघ असा आहे ज्यांनी या स्पर्धेत एकही सामना जिंकलेला नाही. पण त्यांनी फक्त दोनच सामने खेळले आहेत. 
 

Web Title: AFG vs HKG Asia Cup 2025 Afghanistan Opens Campaign With 94 Run Win Over Hong Kong They Have Not Won A Single Game In 12 Appearances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.