अभिमानास्पद! ठाण्याच्या प्रेम देवकरची अंडर-१९ आशिया चषकासाठी टीम इंडियात निवड

Prem Devkar in team india : ठाणे जिल्ह्याचा सुपुत्र प्रेम देवकरची वर्णी लागली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 03:52 PM2023-12-01T15:52:15+5:302023-12-01T15:52:37+5:30

whatsapp join usJoin us
ACC Men's U19 Asia Cup India's Squad Prem Devkar from Maharashtra's Thane district has got an opportunity in Team India, Nationalist Congress MLA Jitendra Awad praised him and wished him all the best for the future | अभिमानास्पद! ठाण्याच्या प्रेम देवकरची अंडर-१९ आशिया चषकासाठी टीम इंडियात निवड

अभिमानास्पद! ठाण्याच्या प्रेम देवकरची अंडर-१९ आशिया चषकासाठी टीम इंडियात निवड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ACC Men’s U19 Asia Cup India's Squad : भारताच्या अंडर-१९ संघात महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याचा सुपुत्र प्रेम देवकरची वर्णी लागली आहे. आगामी काळात १९ वर्षाखालील आशिया चषक खेळवला जाणार आहे, यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली. खरं तर गोलंदाज प्रेम देवकरला राखीव खेळाडू म्हणून संधी मिळाली आहे. म्हणजेच भारतीय संघातील एखादा गोलंदाज दुखापतीमुळे अथवा अन्य कोणत्या कारणास्तव उपलब्ध नसल्यास प्रेम मैदानात उतरेल. भारताचा १५ सदस्यीय संघ जाहीर झाला असून पंजाबकडून खेळणाऱ्या उदय सहारनकडे या संघाची कमान सोपवण्यात आली. दुबईच्या यजमानात ही स्पर्धा खेळवली जाईल. या स्पर्धेला ८ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे, तर अंतिम सामना रविवारी १७ डिसेंबर रोजी होणार आहे.

दरम्यान, प्रेमची भारतीय संघात निवड झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्याची भेट घेऊन त्याला शुभेच्छा दिल्या. "आगामी क्रिकेट एशिया कपसाठी ठाणे जिल्ह्यातील मोठी देसाई गावचा भूमिपुत्र आणि तडफदार गोलंदाज, प्रेम देवकर याची एशिया क्रिकेट कपच्या अंडर-१९ संघात निवड झाली आहे.त्याला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा", अशा आशयाची पोस्ट आव्हाड यांनी केली. 

अंडर-१९ आशिया चषक २०२३ साठी भारतीय संघ -
उदय सहारन (कर्णधार), अर्शिन कुलरनी, आदर्श सिंह, रुद्र पटेल, सचिन, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, अरावेल्ली अवनीश राव, सौम्य कुमार, मुर्गन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौड, आराध्या शुक्ला, नमम तिवारी, राज लिंबानी.

राखीव खेळाडू - प्रेम देवकर, अंश गोसाई, मोहम्मद अमन. 

आशिया चषकात भारतीय संघाचा दबदबा
भारतीय संघ अंडर-१९ आशिया चषकाचा गतविजेता आहे. अर्थात भारताने मागील हंगामात विजेतेपद पटकावले होते. भारताचा अंडर-१९ संघ हा स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. या स्पर्धेत भारताने सर्वाधिक आठवेळा किताब जिंकला आहे. मागील पर्वात २०२२ मध्ये निशांत सिंधूच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. टीम इंडियाने एकतर्फी सामना जिंकला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेचा संघ ३८ षटकांत अवघ्या १०६ धावांत सर्वबाद झाला. भारताकडून विकी ओस्तवालने सर्वाधिक ३ बळी घेतले. याशिवाय कौशल तांबेने २ बळी घेतले. तर रवी कुमार आणि राज बावा यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले होते. 

Web Title: ACC Men's U19 Asia Cup India's Squad Prem Devkar from Maharashtra's Thane district has got an opportunity in Team India, Nationalist Congress MLA Jitendra Awad praised him and wished him all the best for the future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.