Asia Cup 2025 IND vs PAK, Abhishek Sharma Revealed Pakistani Players Made Personal Attacks After Every Ball शाळेपासून एकत्र खेळणाऱ्या अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या जोडीनं दुबईच्या मैदानात पाकिस्तानच्या गोलंदाजांना चांगलेच चोपून काढले. सुपर फोरमधील लढतीत पाकिस्तानच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना दोघांनी संघाला दमदार सुरुवात करुन दिली. या जोडीनं पॉवर प्लेमध्येच आपली ताकद दाखवत पाकिस्तानच्या संघाला बॅकफूटवर ढकलले. दोघांनी शतकी भागीदारीचा डाव साधत खास विक्रमही रचला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जोडीन फक्त गोलंदाजीचा नव्हे 'स्लेजिंग'चाही केला सामना
हायहोल्टेज लढतीत या जोडीनं फक्त गोलंदाजीचा नाही तर पाक खेळाडूंनी केलेल्या स्लेजिंगचाही सामना केला. भारत-पाक यांच्यातील लढती वेळी शाहीन शाह आफ्रिदी आणि शुबमन गिल या दोघांच्यात शाब्दिक चकमक झाली. अभिषेक शर्माही हारिस राउफला भिडल्याचे पाहायला मिळाले. सामन्यानंतर अभिषेक शर्मानं मैदानातील स्लेजिंगचा डाव पाकच्या खेळाडूंनी सुरु केल्याचा मोठा खुलासा केला. पाकिस्तानी खेळाडूंनी विनाकारण पंगा घेतल्याचे सांगत शुबमन गिलसोबत मिळून त्यांना धडा शिकवायचे ठरवले, असेही तो म्हणाला आहे.
मॅचनंतर नेमकं काय म्हणाला अभिषेक शर्मा?
भारत-पाक यांच्यातील सामन्यानंतर अभिषेक शर्मानं ब्रॉडकास्टर्सशी संवाद साधला. यावेळी तो म्हणाला की, "मैदानात ते (पाकिस्तानी खेळाडू) प्रत्येक चेंडूनंतर स्लेजिंग करत होते. त्यामुळे त्यांना रिप्लाय देणं गरजेचे होते. मी आणि शुभमन गिलनं बॅटने उत्तर देत मॅच जिंकून दाखवायचं ठरवलं. त्यात आम्ही यशस्वी ठरलो. शेवटी आम्हीच जिंकलो, असे सांगत पाक खेळाडूंनी मैदानात असभ्य वर्तन केल्याचा खुलासा त्याने केलाय.
गिल वर्सेस आफ्रिदी अन् अभिषेक वर्सेस हारिस राउफ
भारताच्या डावातील तिसऱ्या षटकात शुबमन गिलनं गोलंदाजीत मार खाल्ल्यावर स्लेजिंगचा डाव खेळणाऱ्या शाहीन शाह आफ्रिदीची जिरवली. दोन खणखणीत चौकार मारल्यावर गिलनं "जा बॉल आण..." असे हातवारे करत आफ्रिदीवर राग काढला. हा प्रसंग ११९६ मध्ये रंगलेल्या भारत-पाक सामन्यावेळी पाहायला मिळालेल्या आमिर सोहेल वर्सेस व्यंकटेश प्रसांद यांच्यातील टशनच्या आठवणीला उजाळा देणारा असा होता. त्यानंतर पाचव्या षटकात अभिषेक शर्मा आणि हारिस राउफ यांच्यात राडा झाला. दोघांच्यातील भांडण मिटवण्यासाठी पंचांना मध्यस्थी करावी लागली. हे जे काही घडंल त्याची सुरुवात पाकिस्तानी खेळाडूंनी केली होती. एवढेच नाही प्रत्येक चेंडूनंतर ते उसकावण्याचा प्रयत्न करत होते, असं अभिषेक मॅचनंतर म्हणाला.
Web Title: Abhishek Sharma Revealed Pakistani Players Made Personal Attacks After Every Ball IND vs PAK Asia Cup 2025 Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.