BCCI Central Contract : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) आगामी केंद्रीय करारबद्ध खेळाडूंच्या यादीत कुणाला संधी मिळणार? याची सध्या चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. नव्या यादीत फारसा बदल होणार नसला तरी याआधी वगळण्यात आलेल्या खेळाडूंसह काही नवी नावे नव्या यादीत झळकू शकतात. आयपीएलमध्ये धमक दाखवणाऱ्या तिघांना पहिल्यांदाच बीसीसीआयच्या केंद्रीय करारबद्ध खेळाडूंच्या यादीत स्थान मिळू शकते, असे वृत्त आता समोर येत आहे. जाणून घेऊयात कोण आहेत ते खेळाडू यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या तिघांची नावे चर्चेत
बीसीसीआय लवकरच केंद्रीय करारबद्ध खेळाडूंची घोषणा करू शकते. क्रिकबझच्या वृत्तानुसार, आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करून दाखवणाऱ्या अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा या तिघांचा बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंच्या यादीत समावेश केला जाऊ शकतो. बीसीसीआयच्या नियमानुसार, अभिषेक शर्मानं ठराविक कालावधीत टीम इंडियाकडून १२ टी सामने खेळले आहेत. याशिवाय नितीश कुमार रेड्डीनेही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ५ कसोटी सामन्यासह ४ टी-२० सामने खेळला आहे.
BCCI Central Contract : ऋतुराज गायकवाडचा पत्ता कट होणार? जाणून घ्या त्यामागचं कारण
हर्षित राणासह वरुण चक्रवर्तीही प्रबळ दावेदार
या दोघांशिवाय हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांनाही करारबद्ध खेळाडूंच्या यादीत स्थान मिळू शकते. हर्षित राणाने टीम इंडियाकडून आतापर्यंत २ कसोटीसह ५ वनडे आणि १ टी २० सामना खेळला आहे. बीसीसीआय करारास पात्र ठरण्यासाठी ठराविक काळात जेवढे सामने खेळायचे होते तेवढे सामने तो खेळलेला नाही. पण तिन्ही प्रकारात त्याने टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व केल्यामुळे त्याच्यासाठी संधी निर्माण होऊ शकते. याशिवाय ४ वनडे आणि १८ टी २० सामन्यासह वरुण चक्रवर्तीही या यादीत स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे.