आशिया कप स्पर्धेत विक्रमी कामगिरीसह ICC रँकिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्डचा डाव साधणाऱ्या अभिषेक शर्माला ICC प्लेयर ऑफ द मंथच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. त्याच्यासोबत या शर्यतीत आशिया कप स्पर्धेत आपल्या फिरकीतील जादू दाखवून देणाऱ्या कुलदीप यादवचाही समावेश आहे. ICC च्या पुरस्कारासाठी या दोन भारतीयांना टक्कर देणाऱ्या तिसऱ्या खेळाडूच्या यादीत झिम्बाब्वेच्या ब्रायन बेनेटचा समावेश आहे. सप्टेंबरमध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर फायनल बाजी कोण मारणार? ते पाहण्याजोगे असेल. इथं एक नजर टाकुयात तिघांत कुणाच पारड अधिक जड आहे त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अभिषेक शर्मानं आशिया कप स्पर्धेत केलाय मोठा पराक्रम
UAE च्या मैदानात पार पडलेल्या आशिया कप स्पर्धेत अभिषेक शर्मानं कमालीची कामगिरी करून दाखवली होती. या स्पर्धेत त्याने ३ अर्धशतकाच्या मदतीने २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटसह ३१४ धावा कुटल्या. आतापर्यंतच्या टी-२० आशिया कप स्पर्धेत ३०० पेक्षा अधिक धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला. एवढेच नाही तर या कामगिरीच्या जोरावर आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत त्याने ऑलटाइम सर्वोत्तम रेटिंग पॉइंट्सची कमाई करत नवा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला. त्यामुळे यावेळीच्या ICC प्लेयर ऑफ द मंथच्या पुरस्काराचा तो प्रबळ दावेदार ठरतो.
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
कुलदीप यादव आणि ब्रायन बेनेटची दमदार कामगिरी, पण..
आशिया कप स्पर्धेत कुलदीप यादवनं सर्वाधिक १७ विकेट्स घेत टीम इंडियाला नववे जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. UAE विरुद्धच्या सामन्यात कुलदीप यादवनं फक्त ७ धावा खर्च करत ४ विकेट्सचा डावही साधला होता. फायनलमध्ये त्याने पाकिस्तान विरुद्ध ३० धावांत ४ विकेट्स घेत सामना फिरवला होता. झिम्बाब्वेच्या ब्रायन बेनेट यानेही सप्टेंबरमध्ये धमाकेदार कामगिरी करून दाखवलीये. त्याने ५५.२२ च्या सरासरीसह १६५.६६ च्या स्ट्राइक रेटनं ४९७ धावा कुटल्या आहेत. पण या दोघांत स्ट्राईक रेट आणि ICC टी-२० रँकिंगमधील सर्वोच्च कामगिरीच्या जोरावर अभिषेक बाजी मारेल, असे वाटते.
महिला गटातून स्मृती मानधनाही शर्यतीत
महिला गटातून स्मृती मानधना पुन्हा एकदा ICC च्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. सप्टेंबरमध्ये ४ एकदिवसीय सामन्यात तिने ७७ च्या सरासरीसह १३५.६८ च्या सरासरीनं ३०८ धावा केल्या आहेत. तिची स्पर्धा ही पाकिस्तानची सिदरा अमीन आणि दक्षिण आफ्रिकेच्या तझमिन ब्रिट्स हिच्यासोबत असेल.