Asia Cup Ind vs PAK, Super Fours Match Abhishek Sharma Drops A Catch Of Sahibzada Farhan : भारत-पाकिस्तान यांच्यातील सुपर फोरमधील लढतीत भारतीय संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्याने पहिल्या षटकातच सलामीवीर साहिबजादा फरहान याला आपल्या जाळ्यात अडकवले होते. पण अभिषेक शर्मा गडबडला अन् पाकिस्तानला पहिला धक्का देण्याची संधी हुकली. अभिषेक शर्मानं कॅच सोडल्यावर हार्दिक पांड्या हताश दिसला. दुसऱ्या बाजूला कर्णधार सूर्यकुमार यादवनं हातवारे करून असू देत आता खेळावर फोकस कर असं म्हणत त्याला गेममध्ये राहण्याचा इशारा केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एक चेंडू खेळल्यावर थांबला खेळ, तिसऱ्या चेंडूवर पाकचा सलामीवीर फसला, पण...
दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात हार्दिक पांड्याने पहिला चेंडू निर्धाव टाकल्यावर पाकिस्तानी संघातील सलामवीरानं ग्लोव्ह्ज टेपिंगच्या बहाण्याने खेळ थांबवला. जी गोष्ट अधिक करून घ्यायची होती ती त्याला सामना सुरु झाल्यावर आठवली. त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव खेळल्यावर थर्ड मॅनला त्याने हवेत फटका खेळला. अभिषेक शर्मा एक चांगला क्षेत्रक्षक आहे. पण तो अंदाज घ्यायला चुकला अन् भारतीय संघाला पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर विकेट घेण्याची निर्माणा झालेली संधी हुकली.
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
पुन्हा तीच चूक अन् पाकच्या सलामीवीरानं साधला अर्धशतकी डाव
अभिषेक शर्मानं झेल सोडला त्यावेळी पाकिस्तानचा सलामीवीर साहिबझादा फरहान याने खातेही उघडले नव्हते. याच चेंडूवर दोन धावा देत त्याने खाते उघडले. त्यानंतर वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवरही त्याच्या झेलची संधी निर्माण झाली होती. यावेळीही अभिषेक शर्माच होता. ३९ धावांवर मिळालेल्या दुसऱ्या संधीनंतर त्याने अर्धशतक झळकावले.
Web Title: Abhishek Sharma drops a catch of Sahibzada Farhan in Super Fours of Asia Cup 2025
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.