ICC T20 World Cup, IND vs NAM Abhishek Sharma Discharged From Hospital भारतीय संघ टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील आपला दुसरा सामना गुरुवारी नामिबियाविरुद्ध खेळणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येईल. या लढतीआधी टीम इंडियातील मध्यफळीतील स्टार फलंदाज तिलक वर्मानं प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माच्या तब्येतीसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. एवढेच नाही तर अजूनही तो प्लेइंग इलेव्हनच्या रणनितीचा भाग असल्याचे म्हटले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्या सामन्यात 'गोल्डन डक', दुसऱ्या सामन्याआधी अभिषेकला रुग्णालयात दाखल करण्याची आली वेळ
भारतीय संघाने मुंबईतील वानखेडेच्या मैदानातून अमेरिकेविरुद्धच्या लढतीनं यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या मोहिमेची सुरुवात केली. पहिल्या सामन्यात अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की ओढावली होती. त्यानंतर तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता. दुसऱ्या सामन्याआधी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे भारतीय संघ त्याच्याशिवाय मैदान उतरणार का? पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापर्यंत अभिषेक शर्मा तंदुरुस्त होणार का? असे अनेक प्रश्न चर्चेत आले. दुसऱ्या सामन्याआधी तिलक वर्माने युवा सलामीवीराच्या तब्येतीसह त्याच्या प्लेइंग इलेव्हनमधील उपलब्धतेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
SA vs AFG : ट्विस्टवर ट्विस्ट! विजयी धाव घेताना फ्री हिटवर रनआउट अन् सामना सुपर ओव्हरमध्ये गेला
डिस्चार्ज मिळाला! अभिषेक शर्मा नामिबियाविरुद्धच्या सामन्यात खेळणार? तिलक वर्मानं दिली माहिती
बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत तिलक म्हणाला "जेव्हा आम्ही दिल्लीला पोहोचलो, तेव्हा त्याला तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. आज त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. आमच्याकडे अजून एक दिवस आहे, त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्यासंदर्भातील अंतिम निर्णय सामन्याच्या दिवशी घेण्यात येईल."
टीम इंडिया घाई गडबड केली नाही तर संजूला लॉटरी!
भारतीय संघ व्यवस्थापन कोणतीही जोखीम न घेता अभिषेक शर्माला विश्रांती देऊ शकते. कारण पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी अभिषेक नावाची तोफ अत्यंत गरजेची आहे. या परिस्थितीत संजू सॅमसनला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पहिला सामना खेळण्याची संधी मिळू शकते. २०२४ च्या हंगामातही संजू टी-२० वर्ल्ड कप संघाचा भाग होता. पण त्याला संपूर्ण स्पर्धेत बाकावरच बसावे लागले होते. यंदाच्या हंगामात संजू सॅमसन हा सलामीवीराच्या रुपात पहिली पसंती होता. पण न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तो सपशेल अपयशी ठरला. त्यामुळे त्याच्या जागी भारतीय संघाने ईशान किशनला संधी देत दोन्ही डावखुऱ्यांसह डावाला सुरुवात करण्याला पसंती दिल्याचे पाहायला मिळाले.
Web Summary : Abhishek Sharma was discharged from the hospital. Tilak Varma said the final decision about playing him against Namibia will be taken on match day. Sanju Samson is an option.
Web Summary : अभिषेक शर्मा को अस्पताल से छुट्टी मिल गई है। तिलक वर्मा ने कहा कि नामीबिया के खिलाफ उन्हें खिलाने पर अंतिम फैसला मैच के दिन लिया जाएगा। संजू सैमसन एक विकल्प हैं।