दक्षिण आफ्रिका अंडर-१९ संघाविरुद्धच्या तिसऱ्या युवा एकदिवसीय सामन्यात भारतीय सलामी जोडीने जबरदस्त कामगिरी केली. नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या भारतीय अंडर-१९ संघाकडून कर्णधार वैभव सूर्यवंशी आणि एरॉन जॉर्ज यांनी डावाची सुरुवात केली. दोघांनीही दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर आक्रमक फटकेबाजी करत अंडर १९ वर्ल्ड कपसाठी फलंदाजीतील ताकद दाखवून दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वैभव सूर्यवंशीसोबत एरॉनची २२७ धावांची भागीदारी
वैभव सूर्यवंशीने अवघ्या ६३ चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. या सामन्यात त्याने ७४ चेंडूंत १२७ धावांची शानदार खेळी केली. वैभव आणि एरॉन यांनी पहिल्या विकेटसाठी १५४ चेंडूंत २२७ धावांची दमदार सलामी दिली,वैभव बाद झाल्यानंतर एरोन जॉर्जने आपलं शतक पूर्ण केलं. एरोनने ९१ चेंडूत शतक साजरे केले. त्याने वेदांत त्रिवेदीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ५५ चेंडूंत ५२ धावांची भागीदार रचली. आयुष म्हात्रेच्या अनुपस्थितीत डावाची सुरुवात करताना एरोनने १११.३२ च्या स्ट्राइक रेटने १०६ चेंडूंत ११८ धावांची खेळी साकारली. या खेळीत त्याने १६ चौकार मारले.
Vaibhav Suryavanshi Century : वैभव सूर्यवंशीची विश्वविक्रमी सेंच्युरी! असा पराक्रम करणारा पहिला कॅप्टन
अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेआधी पुन्हा गवसला फॉर्म
एरॉन जॉर्ज याच्याकडे संजू सॅमसनची कॉपी म्हणून पाहिले जात आहे. १ ऑक्टोबर २००६ मध्ये केरळमध्ये जन्मलेला एरॉन आघाडीच्या फळीतील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे सिद्ध केले आहे. जव्या हाताचा फलंदाज पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरला होता. पण आगामी अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेआधी तो पुन्हा फॉर्ममध्ये आला आहे. पहिल्या सामन्यात ५ तर दुसऱ्या सामन्यात तो २० धावांवर बाद झाला होता.
दोघांच्या शतकाच्या जोरावर युवा टीम इंडियाने उभारली मोठी धावसंख्या, पण...
वैभव सूर्यवंशी आणि एरॉन जॉर्ज यांच्यात शतकी खेळीच्या जोरावर युवा भारतीय संघाने निर्धारित ५० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात ३९३ धावा केल्या. युवा टीम इंडियाचा ४०० धावांचा पल्ला गाठण्याचा डाव अवघ्या ७ धावांनी हुकला. भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यातील विजयासह मालिका आधीच खिशात घातली आहे. हा सामना जिंकून वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला यजमानांना क्लीन स्वीप देण्याची चांगली संधी आहे.