Join us

"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)

संजनानं Sony Liv च्या खास शोमध्ये बॉलिवूडकरांसमोर केलेल्या 'डायलॉगबाजी'चा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 03:00 IST

Open in App

Aakhi Duniya Ek Taraf Mera Bumrah Ek Taraf Sanjana Ganesan Chat With Actors Bobby Deol And Raghav Juyal : आशिया चषक स्पर्धेतील बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातील विजयासह टीम इंडियानं फायनलचं तिकीट बूक केलं. या सामन्यात जसप्रीत बुमराहनं कमालीची गोलंदाजी केली. बुमराहच्या गोलंदाजीशिवाय या सामन्या दरम्यान त्याची पत्नी अन् स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन हिने केलेल्या खास 'बोलंदाजी'नं सर्वांच लक्षवेधून घेतले. बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल आणि राघव जुयाल यांच्यासोबत गप्पा मारताना संजना गणेशन हिने नवऱ्याचं कौतुक करणारा डॉयलॉग मारला. बॉलिवूड कलाकारांसोबतचा संजनाचा हा खास व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

दुबईच्या स्टेडियममध्ये संजना गणेशन हिनं बॉलिवूड अभिनेत्यांसोबत मारल्या गप्पा

भारत-बांगलादेश यांच्यातील सामन्या वेळी बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल आणि राघव जुयाल या दोघांनी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हजेरी लावली होती. 'द बैड्स ऑफ बॉलीवुड'च्या प्रमोशनसाठी येऊन मॅचचा आनंद घेणाऱ्या या मंडळींसोबत संजना गणेशन हिने गप्पा मारल्या. भारतीय संघ गोलंदाजी करत बांगलादेशच्या संघाने ५२ धावांवर २ विकेट्स गमावल्या होत्या. त्यावेळी स्टेडियममध्ये संजना बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांची मुलाखत घेताना दिसली.

Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल

..अन् संजनानं Sony Liv च्या खास शोमध्ये बॉलिवूडकरांसमोर केली 'डायलॉगबाजी'

संजनासोबत संवाद साधताना बॉबी देओलनं भारतीय संघातील गोलंदाजांचो कौतुक केले. जसप्रीत बुमराहचा स्पेल सर्वोत्तम होता, असा उल्लेख करत हा सामना भारतीय संघ जिंकणार असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर राघव जुयाल याने बुमराहची क्रेझ दाखवून दिली. मी बुमराहचा फार मोठा चाहता आहे, असे म्हणत त्याने आपल्या सीरीजमधील "अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ!” हाय डायलॉग रिपीट करण्याची विनंती संजनाला केली. Sony Liv च्या शोमध्ये तिनेही मग तो हा डायलॉग मारत मैफील लुटली. सोनी नेटवर्कच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन देखील हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

बुमराहचा भेदक मारा

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात महागडा ठरलेल्या बुमराहनं बांगलादेशविरुद्धच्या साम्यातून दमदार कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले. बांगलादेशच्या डावातील दुसऱ्या आणि आपल्या पहिल्याच षटकात त्याने सलामी जोडी फोडली. या सामन्यात ४ षटकात फक्त १८ धावा खर्च करुन त्याने २ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. 

टॅग्स :आशिया कप २०२५एशिया कपभारत विरुद्ध बांगलादेशजसप्रित बुमराहसंजना गणेशनबॉबी देओल