Join us

जादू की भूत? आकाश चोप्रानं शेअर केला भयावह Video; तुम्हालाही बसेल धक्का

आकाश चोप्रानं शेअर केलेला व्हिडीओ एका पार्कमधील आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 12:34 IST

Open in App

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओची फारच चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असलेल्या चोप्रानं शेअर केलेला व्हिडीओ पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. अनेकांना भीती वाटत आहे, तर ही कोणती जादू आहे, याबाबत जाणून घेण्याची उत्सुकताही वाढताना दिसत आहे. (भारतीय क्रिकेट वाटचालीचा साक्षीदार हरपला; माजी खेळाडूनं झोपेतच घेतला अखेरचा श्वास)

आकाश चोप्रानं शेअर केलेला व्हिडीओ एका पार्कमधील आहे. त्यात कसरतीसाठी ठेवलेल्या मशीन आपोआप चालताना दिसत आहेत. त्या मशीनवर कोणीही बसलेलं नाही आणि तरीही ती चालत आहे. ही ऑटोमॅटीक मशीन नाही आणि त्यामुळेच सर्वांना आश्चर्य वाटत आहे. उत्तर प्रदेशमधील पार्कचा हा व्हिडीओ असल्याचे चोप्रानं सांगितले. पोलिसही हा प्रसंग आपल्या कॅमेरात टिपताना दिसत आहेत.  

चोप्रानं या व्हिडीओ मागचं रहस्य उलगडणारा व्हिडीओही शनिवारी सकाळी पोस्ट केला. त्यात ही जादू किंवा भूत असा प्रकार नसून ते मशीनच अशा प्रकारे तयार करण्यात आले आहे. 

पाहा व्हिडीओ...

अम्फान वादळ: दहा हजार कुटुंबीयांच्या मदतीसाठी सौरव गांगुली रस्त्यावर!

ऑस्ट्रेलियातील रस्त्यांवर झळकतायत कोहली, तेंडुलकर यांच्या नावाचे फलक; जाणून घ्या कारण 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया