Join us

Aakash Chopra Twitter: 'तू कॉमेंट्री करणं बंद कर...'; आकाश चोप्राकडे नेटिझनची मागणी, मिळालं मजेशीर प्रत्युत्तर

सोशल मीडियामुळे सामान्यांनाही रोखठोक व्यक्त होण्याची ताकद दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सामन्यांना त्यांच्या सेलिब्रिटींशी देखील थेट संवाद साधता येतो किंवा त्यांची तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचवता येते. याची अनेक उदाहरण देखील आपण पाहिली आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 15:18 IST

Open in App

नवी दिल्ली-

सोशल मीडियामुळे सामान्यांनाही रोखठोक व्यक्त होण्याची ताकद दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सामन्यांना त्यांच्या सेलिब्रिटींशी देखील थेट संवाद साधता येतो किंवा त्यांची तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचवता येते. याची अनेक उदाहरण देखील आपण पाहिली आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात लवकरच क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेआधी माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा याच्यावर एक क्रिकेट चाहता चांगलाच नाराज झाला आहे. 

एका ट्विटर युझरनं आकाश चोप्राला टॅग करुन तू कॉमेंट्री करणं बंद कर असा सल्ला देऊ केला आहे. त्यावर आकाश चोप्रा यानंही मजेशीर प्रत्युत्तर दिलं आहे. 

नेमकं घडलं काय?आकाश चोप्रा यानं मर्यादित षटकांसाठी भारतीय संघाच्या दृष्टीकोनाबाबत एक लेख लिहिला आहे. त्यावर एका युझरनं प्रतिक्रिया दिली आहे. संदीप कुमार नावाच्या युझरनं म्हटलं की, ''आकाश जी, तुम्ही आधी कॉमेंट्री करणं बंद करा. मग बघा भारतीय संघ पुन्हा फॉर्मात येईल आणि भारतीय संघाचे फलंदाजी धावा करू लागतील. तुम्ही स्वत:च एकदा शांत बसून निरीक्षण करा, कारण तुम्ही जेव्हा कॉमेंट्री करायला येता तेव्हाच भारतीय संघाचे फलंदाज बाद होण्यास सुरुवात होते. त्यामुळे तुम्ही कॉमेंट्री न केलेलीच बरी"

आकाश चोप्रानंही घेतली दखलसंदीप कुमार नावाच्या युझरच्या प्रतिक्रियेची आकाश चोप्रानंही दखल घेतली आहे. आकाश चोप्रानं मजेशीर प्रतिक्रिया दिली. "कोणत्याही समस्येकडे पाहण्याचे एकाहून अधिक मार्ग असतात. संदीप यांनी तर कारणांवरही भाष्य केलं आहे", अशी प्रतिक्रिया आकाश चोप्रा यानं दिली आहे. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाबीसीसीआय
Open in App