VIDEO: आफ्रिदीने भारताच्या 'तिरंग्या'वर दिला ऑटोग्राफ; पाकिस्तानच्या खेळाडूच्या कृतीनं जिंकली मनं

shahid afridi sign indian flag: पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा भारताच्या तिरंग्यावर ऑटोग्राफ देतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 03:14 PM2023-03-19T15:14:52+5:302023-03-19T15:15:46+5:30

whatsapp join usJoin us
A video of former Pakistan captain Shahid Afridi autograph on the Indian flag during legends league cricket 2023 is going viral  | VIDEO: आफ्रिदीने भारताच्या 'तिरंग्या'वर दिला ऑटोग्राफ; पाकिस्तानच्या खेळाडूच्या कृतीनं जिंकली मनं

VIDEO: आफ्रिदीने भारताच्या 'तिरंग्या'वर दिला ऑटोग्राफ; पाकिस्तानच्या खेळाडूच्या कृतीनं जिंकली मनं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

legends league cricket 2023 । कतार : पाकिस्तान क्रिकेट संघाचा (Pakistan Cricket Team) माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) सध्या कतार येथे लीजेंड्स लीग क्रिकेट (LLC 2023) खेळत आहे. नुकताच त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारतीय प्रेक्षकाच्या सांगण्यावरून आफ्रिदी भारताच्या तिरंग्यावर त्याचा ऑटोग्राफ देत आहे. भारतीय ध्वजावर ऑटोग्राफ देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमी त्याच्या हावभावाचा आदर करत आफ्रिदीबद्दलचे प्रेम व्यक्त करत आहेत. 

दरम्यान, शाहिद आफ्रिदी कतारची राजधानी दोहा येथे सुरू असलेल्या लीजेंड्स लीग क्रिकेट मास्टर्स ट्वेंटी-20 स्पर्धेत सहभागी झाला आहे. या दरम्यान जगभरातील माजी दिग्गज खेळाडू या लीगच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठ्या व्यासपीठावर खेळत आहेत. अशातच एका सुरक्षा रक्षकाने पाकिस्तानचा दिग्गज आफ्रिदीकडून ऑटोग्राफ मागितला आणि त्याने आपला भारतीय ध्वज पुढे केला, ज्यावर शाहिद आफ्रिदीने लगेच ऑटोग्राफ दिला. त्यानंतर त्याने टी-शर्टवर देखील ऑटोग्राफ दिला आणि बसमध्ये चढला.  

शाहिद आफ्रिदी अन् भारताचा तिरंगा 
याआधी देखील पाकिस्तानच्या या माजी दिग्गज फलंदाजाने भारतीय ध्वजाबाबत आपले प्रेम दाखवले आहे. एका स्पर्धेदरम्यान, त्याने भारतीय प्रेक्षकाने धरलेला उलटा ध्वज सरळ करून चाहत्यांसोबत फोटो काढला होता, ज्यावर भारतीय प्रेक्षकांनी त्याच्या कृतीबद्दल त्याच्याप्रती प्रेम व्यक्त केले होते. मागील वर्षी भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान आफ्रिदीच्या मुलीने देखील भारताचा ध्वज फडकावला होता. यावरून बराच गदारोळ देखील झाला होता. त्यानंतर खुद्द आफ्रिदीने याविषयी स्पष्टीकरण दिले होते.

यावर शाहिद आफ्रिदीने म्हटले होते की, "हो, मला माहिती आहे, माझे कुटुंब तिथे बसले होते. व्हिडीओ मला पाठवला जात होता आणि मी पाहत होतो आणि माझी पत्नी सांगत होती की, इथे फक्त 10 टक्के पाकिस्तानी आहेत. बाकी 90 टक्के फक्त भारतीय आहेत. पाकिस्तानचा ध्वजही तिथे सापडला नाही. म्हणूनच माझ्या लहान मुलीने हातात भारताचा ध्वज घेतला होता." 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: A video of former Pakistan captain Shahid Afridi autograph on the Indian flag during legends league cricket 2023 is going viral 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.