Crime: विराट, रोहितला शिवी दिली म्हणून मित्राच्या डोक्यात घातली कुऱ्हाड, जागीच ठार!

रोहित, विराटला शिवी दिली म्हणून मित्राने मित्राची हत्या केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 12:46 IST2022-10-14T12:46:09+5:302022-10-14T12:46:58+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
A friend has killed a friend for abusing Rohit Sharma and Virat Kohli in Tamil Nadu   | Crime: विराट, रोहितला शिवी दिली म्हणून मित्राच्या डोक्यात घातली कुऱ्हाड, जागीच ठार!

Crime: विराट, रोहितला शिवी दिली म्हणून मित्राच्या डोक्यात घातली कुऱ्हाड, जागीच ठार!

नवी दिल्ली : भारतात सर्वाधिक क्रिकेटचे चाहते आहेत. तसेच भारतीय क्रिकेटपटूंची क्रेझ चाहत्यांना आकर्षित करत असते. क्रिकेटर्सना जितके चाहते ट्रोल करतात, तितकेच ते त्यांच्यावर प्रेम देखील करतात. मात्र आता खेळाडूंच्या प्रेमापोटी एका चाहत्याने आपल्या मित्राचा जीव घेतला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली (Rohit Sharma And Virat Kohli) यांना शिवी दिली म्हणून एकाला जीव गमवावा लागला आहे. तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यात घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. 

दरम्यान, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना शिवी दिल्यामुळे एका तरुणाने आपल्या मित्राची हत्या केली आहे. तमिळ मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाचा मित्र विराट कोहली आणि रोहित शर्माबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरत होता. यावरून तरूण संतापला आणि त्याने आपल्या मित्राची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केली. विघ्नेश असे मृत तरूणाचे नाव असून धर्मराज असे मारेकऱ्याचे नाव आहे. लक्षणीय बाब म्हणजे हा प्रकार दारूच्या नशेत असताना घडला असल्याचे सांगितले जात आहे. 
 
रोहित, विराटला शिवी दिली म्हणून केली हत्या 
गावाजवळच्या जंगल परिसरात तीन मित्रांनी एकत्र दारू प्यायली, तिथे झालेल्या वादानंतर धर्मराजने विघ्नेशची निघृण हत्या करून तिथून पळ काढला. मात्र धर्मराजला पकडण्यात पोलिसांना यश आले असून पोलीस तपासादरम्यान धर्मराजने सांगितले की, "आमच्यात क्रिकेटविषयी चर्चा झाली होती आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विघ्नेशने केलेली शिवीगाळ सहन झाल्याने मी त्याची हत्या केली." या धक्कादायक घटनेची सर्वत्र चर्चा रंगली असून क्रिकेटच्या प्रेमामुळे तरूणाला जीव गमवावा लागला म्हणून परिसरात संतापाचे वातावरण आहे. 

 

Web Title: A friend has killed a friend for abusing Rohit Sharma and Virat Kohli in Tamil Nadu  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.