Join us

IPL 2025 : कोण होणार दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन? टीम इंडियातील या दोघांच्यात तगडी स्पर्धा

टीम इंडियातील दोन चेहरे कॅप्टन्सीच्या शर्यतीत, कोण मारणार फायनल बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 12:42 IST

Open in App

Who Will Captain Of Delhi Capitals In IPL 2025 : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ स्पर्धा आता अवघ्या काही दिवसांवर उरली आहे. या स्पर्धेत सहभागी १० सघांपैकी ९ फ्रँचायझी संघांनी यंदाच्या हंगामासाठी आपल्या कॅप्टनची निवड केलीये. कोलकाता नाईट रायडर्स संघानं अनुभवी भारतीय क्रिकेटर अजिंक्य रहाणेकडे नेतृत्वाची जबाबदारी दिलीये. आता फक्त दिल्ली कॅपिटल्स संघ असा आहे ज्या संघानं अजून आपल्या कॅप्टनची निवड केलेली नाही. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!  

कोण घेईल रिषभ पंतची जागा?

रिषभ पंत संघाबाहेर पडल्यावर त्याची जागा कोण घेणार? अशी चर्चा सध्या रंगताना दिसत आहे. सध्याच्या घडीला कॅप्टन्सीच्या शर्यतीत दोन नावे आघाडीवर आहेत. यातील एकाला या संघाची कॅप्टन्सी मिळू शकते. कोण आहेत ते दोन क्रिकेटर? जे आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या कॅप्टन्सीच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे दिसते त्यासंदर्भातील खास स्टोरी

कॅप्टन्सीच्या शर्यतीत या दोघांत असेल तगडी फाईट!

दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात कॅप्टन्सीच्या शर्यतीत असणारे दोन्ही चेहरे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघातील प्रमुख खेळाडू आहेत. ते दोन क्रिकेटर म्हणजे ऑलराउंडर अक्षर पटेल आणि लोकेश राहुल. एका बाजूला लोकेश राहुलला आयपीएलमध्ये वेगवेगळ्या फ्रँचायझीकडून कॅप्टन्सीचा अनुभव आहे. दुसरीकडे अक्षर पटेल याला काही दिवसांपूर्वीच टीम इंडियाच्या टी-२० संघाचा उप कर्णधार करण्यात आले आहे. त्यामुळे या दोघांतील एकाची निवड करण्याला दिल्ली कॅपिटल्स संघ पसंती देईल. शेवटी फायनल बाजी कोण मारणार ते बघण्याजोगे असेल. 

कॅप्टन्सीचा अनुभव असूनही लोकेश राहुल पडू शकतो मागे

लोकेश राहुल याला कॅप्टन्सीचा तगडा अनुभव आहे. आयपीएलमध्ये कॅप्टन्सीत त्याने चांगली कामगिरी केलीये. पण संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्यात तो कुठंतरी कमी पडलाय. हीच गोष्ट अक्षर पटेलच्या फायद्याची ठरू शकते. याशिवाय भारतीय टी-२० संघाचा उप कर्णधार असल्याशिवाय सध्याच्या घडीला अक्षर पटेल हा नियमित संघाचा भाग राहणारा हुकमी एक्का ठरतोय. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत बढती मिळाल्यावर दबावात संघाला सावरण्याची आपल्यातील धमकही त्याने दाखवून दिलीये. त्यामुळे कॅप्टन्सीच्या शर्यतीत त्याने बाजी मारली तर नवल वाटणार नाही. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५दिल्ली कॅपिटल्सअक्षर पटेललोकेश राहुलभारतीय क्रिकेट संघ