Video: क्रिकेटसाठी कायपण! पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर, मैदानात उतरला ८३ वर्षांचा 'तरूण'

एका गंभीर आजाराशी झुंज देत असूनही 'गडी' बिनधास्त मैदानात उतरला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 01:10 PM2023-08-08T13:10:10+5:302023-08-08T13:13:20+5:30

whatsapp join usJoin us
83 year old former Scottish cricketer Alex Steele plays with oxygen cylinder on his back salute to his passion for cricket | Video: क्रिकेटसाठी कायपण! पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर, मैदानात उतरला ८३ वर्षांचा 'तरूण'

Video: क्रिकेटसाठी कायपण! पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर, मैदानात उतरला ८३ वर्षांचा 'तरूण'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Cricket with Oxygen Cylinder, Alex Steele Viral Video: खेळाची आवड असेल तर वय किंवा कोणताही आजार अडथळा ठरत नाही. कोणताही खेळ खेळण्यासाठी वय हा अडथळा नसतो. वयाच्या 80, 90 किंवा 100 व्या वर्षीही माणूस कोणताही मैदानी खेळ खेळू शकतो. असेच काहीसे 83 वर्षीय स्कॉटिश माजी डोमेस्टिक क्रिकेटर अलेक्स स्टीलने दाखवून दिले. अलेक्स स्टील नुकताच स्थानिक क्लबसाठी एक सामना खेळला. यावेळी तो पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर बांधून खेळताना दिसला. या सामन्यात अलेक्सने विकेटकीपिंग केली. ऑक्सिजन सिलेंडरसह विकेटकीपिंग करताना अलेक्सचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

अलेक्स 'या' गंभीर आजाराशी झुंज देत आहे!

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी अलेक्सच्या स्पिरीटचे कौतुक केले आहे. अलेक्स 2020 पासून इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस (श्‍वसन रोग) या आजाराशी झुंज देत आहे. तेव्हा डॉक्टर म्हणाले होते की अलेक्स आता जास्तीत जास्त एक वर्ष जगू शकेल. पण अलेक्सने त्याच्या पॅशनमुळे आणि इच्छाशक्तीमुळे साऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला.

या आजारात नक्की काय घडते?

अलेक्स या आजाराशी झुंज देत असल्याने शरीरात अचानक ऑक्सिजनची कमतरता जाणवते. श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे या आजारात बहुतांश लोकांना आपला जीव गमवावा लागतो. यामुळेच अलेक्स ऑक्सिजन सिलेंडर घेऊन क्रिकेटच्या मैदानात उतरला. अलेक्सने एका मुलाखतीत त्याच्या आजाराबद्दल सांगितले. याबाबत आपण फारसा विचार करत नसल्याचे त्याने सांगितले. अलेक्स म्हणाला की, कोणत्याही आजारासाठी तुम्ही त्याबद्दल कसा विचार करता किंवा तुमचा दृष्टिकोन काय आहे ही महत्त्वाची गोष्ट असते.

अलेक्सने 1967 मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड येथे लँकेशायरविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये इंग्लंड दौऱ्यावर पदार्पण केले. त्याने आपल्या 14 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 24.84 च्या सरासरीने 621 धावा केल्या आणि या दरम्यान त्याने दोन अर्धशतकेही झळकावली. अलेक्स हा १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये स्कॉटिश संघाचा नियमित खेळाडू होता. १९६९ मध्ये त्याने ६ सामने खेळले. 1968 मध्ये आयर्लंडविरुद्ध खेळलेल्या सर्व सामन्यांमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 97 धावा होती. तसेच, यष्टिरक्षक म्हणून अलेक्स स्टीलने 11 झेल घेतले, तर दोन स्टंपिंग केले. आता वयाच्या ८३व्या वर्षीही तो क्रिकेटच्या मैदानावर उतरला आणि ऑक्सिजन सिलेंडर लावून विकेटकीपिंग केली. याबद्दल त्याचे खूप कौतुक होत आहे.

Web Title: 83 year old former Scottish cricketer Alex Steele plays with oxygen cylinder on his back salute to his passion for cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.