AUS vs IND, 4th Test Day 1 Stumps: ऑस्ट्रेलियाकडून चौघांची फिफ्टी; बुमराहनं मॅचमध्ये आणलं, पण...

आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या चार अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या दिवशी ६ बाद ३११ धावांपर्यंत मजल मारली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 14:22 IST2024-12-26T14:20:52+5:302024-12-26T14:22:33+5:30

whatsapp join usJoin us
4th Test Day 1: Jasprit Bumrah Keeps India In Game Australia 311 Loos Of 6 Wickets After Impressive Sam Konstas Debut Steven Smith Not Out | AUS vs IND, 4th Test Day 1 Stumps: ऑस्ट्रेलियाकडून चौघांची फिफ्टी; बुमराहनं मॅचमध्ये आणलं, पण...

AUS vs IND, 4th Test Day 1 Stumps: ऑस्ट्रेलियाकडून चौघांची फिफ्टी; बुमराहनं मॅचमध्ये आणलं, पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

AUS vs IND, 4th Test Day 1 Stumps : मेलबर्नच्या मैदानात सुरु असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या चार अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या दिवशी ६ बाद ३११ धावांपर्यंत मजल मारली आहे.   बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील ५ सामन्यांच्या कसोटी चौथ्या कसोटी सामन्यात पॅट कमिन्सनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीरांनी तगडी सुरुवात करुन देत कॅप्टनचा निर्णय सार्थ ठरवला. 

पहिल्या सेशनमध्ये १९ वर्षांच्या पोरानं केली हवा, पदार्पणात मारली फिफ्टी

मेलबर्नच्या मैदानातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या १९ वर्षीय सॅम कॉन्स्टास (Sam Konstas) याने पहिल्या सेशनमध्ये हवा केली. त्याने ६५ चेंडूत ६० धावांची दमदार खेळी करताना ६ चौकार आणि २ षटकार मारले. खास करून त्याने बुमराहच्या गोलंदाजीवर आक्रमक अंदाजात केलेली बॅटिंगमुळे तो अधिक चर्चेत राहिला. रवींद्र जडेजाने त्याला पायचित करत संघाला पहिले यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाच्या सलामी जोडीनं पहिल्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी रचली. 

उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेनच्या भात्यातूनही आलं अर्धशतक

ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट पडल्यावर सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि मार्कस लाबुशेन ही जोडी जमली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. ही जोडी बुमराहन फोडली. उस्मान ख्वाजा १२१ चेंडूत ६ चौकाराच्या मदतीने ५७ धावा केल्या. त्यानंतर मार्नस लाबुशेन याने स्टीव्ह स्मिथसोबत डावाला आकार दिला. ही जोडीही टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरताना दिसली. पण वॉशिंग्टनच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका मारण्याच्या नादात लाबुशेनं फसला. तो १४५ चेंडूत संघाच्या धावसंख्येत ७५ धावांची भर घालून माघारी फिरला. स्मिथच्या साथीनं त्याने तिसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली. तो बाद झाला त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या धावफलकावर ३ बाद ३३७ अशी धावसंख्या होती.

बुमराहमुळे टीम इंडिया पुन्हा गेममध्ये आली, पण...

ऑस्ट्रेलिया संघ ३ विकेट्स गमावल्यानंतर मजबूत स्थितीत असताना जसप्रीत बुमराह पुन्हा टीम इंडियाच्या मदतीला धावला. त्याने ट्रॅविस हेडला खातेही न उघडता तंबूत धाडले. एवढेच नाही तर त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या मिचेल मार्शलाही त्याने अवघ्या ४ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. आकाश दीपनं ॲलेक्स कॅरीच्या ३१ (४१) रुपात भारतीय संघाला सहावे यश मिळवून दिले. पण दुसऱ्या बाजूला स्टीव्ह स्मिथ पहिल्या दिवसाअखेर फिफ्टी करून नाबाद परतल्यामुळे ऑस्ट्रेलियाच पारडच जड ठरलं. पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियानं ६ बाद ३११ धावा केल्या होत्या. स्टीव्ह स्मिथ १११ चेंडूचा सामना करून ६८ धावांवर नाबाद होता. दुसऱ्या बाजूला पॅट कमिन्स १७ चेंडूत  ८ धावांवर खेळत होता.  दुसऱ्या दिवशी स्मिथला लवकर आपल्या जाळ्यात अडवण्याचे चॅलेंज टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर असेल. यातही बुमराहलाच पुढाकार घ्यावा लागेल. 

Web Title: 4th Test Day 1: Jasprit Bumrah Keeps India In Game Australia 311 Loos Of 6 Wickets After Impressive Sam Konstas Debut Steven Smith Not Out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.