Join us

वर्ल्ड कप सेमीफायनल हे 4 संघ खेळतील,सचिन तेंडुलकरनं केली भविष्यवाणी; पाकिस्तानला लागेल मिर्ची!

World Cup 2023 : भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने विश्वचषकातील टॉप-4 संघांसंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. सचिनच्या या भविष्यवाणीने पाकिस्तानला नक्कीच मिर्ची लागू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 14:29 IST

Open in App

यावेळच्या विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. स्पर्धेतील पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड असा रंगला. या रोमांचक सामन्यात न्यूझीलंडनेइंग्लंडवर 9 फलंदा राखून एकहाती विजय मिळवला. यातच आता भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने विश्वचषकातील टॉप-4 संघांसंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. सचिनच्या या भविष्यवाणीने पाकिस्तानला नक्कीच मिर्ची लागू शकते.

सचिननं केली विश्वचषकातील टॉप-4 संघांची घोषणा -आयसीसीच्या रिव्हू कार्यक्रमात सचिन तेंदुलकरने सेमीफाइनलसाठी चार संघाची घोषणा केली. यात त्याने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड संघाचा समावेश केला आहे. त्याने पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये स्थान दिलेले नाही. महत्वाचे म्हणजे, यापूर्वी अनेक दिग्गज खेळाडूंनी हेच संघ सेमीफाइनल मध्ये पोहोचू शकतात असा अंदाज बांधला आहे.

यावेळी भारत 2011 ची पुनरावृत्ती करू शकेल? असा प्रश्न विचारला असता सचिन म्हणाला, 'मला आशा आहे, कारण आपला संघ चांगली कामगिरी करत आहे. जर भारतीय संघ मुलभूत गोष्टींवर कायम राहिला तर त्यांच्याकडे संधी आहे. आपल्याकडे उत्तम फलंदाजी क्रम आहे. चांगल्या प्रकारचे ऑलराउंडर्स आहेत. एकूणच आपल्याकडे चांगले फलंदाज आहेत."

सचिन तेंडुलकरने सर्वप्रथम, भारत उपांत्य फेरीत पोहोचणारा प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर 'भारत पहिल्या क्रमांकावर आहे, यात शंका नाही, असेही त्याने म्हटले आहे. याच बरोबर, ऑस्ट्रेलियाच्या बाबतीतही असेच आहे, त्यांच्याकडेही एक संतुलित संघ आहे. मी तिसरा क्रमांक इंग्लंडला देईन. हा संघही मजबूत आहे. कारण या संघात अनुभव आणि युवा खेळाडूंचा चांगला मिलाफ आहे. तसेच, माझा चौथा संघ न्यूझीलंड असेल. कारण ते 2015 आणि 2019 मध्ये अंतिमसामना खेळले आहेत. एवढेच नाही, तर आपण त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिल्यास, त्यांनी विश्वचषकात नेहमीच चांगली कामगिरी केली आहे आणि मी त्यांना उपांत्य फेरी गाठताना पाहत आहे.

टॅग्स :सचिन तेंडुलकरवन डे वर्ल्ड कपभारतआॅस्ट्रेलियाइंग्लंडन्यूझीलंड