Join us

3TC Solidarity Cup : किंगफिशरच्या क्षेत्ररक्षकाचं अचूक टायमिंग; बघा फलंदाज Out की Not Out!

3TC Solidarity Cup :एबी डिव्हिलियर्सच्या संघाची आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 16:02 IST

Open in App

कोरोना व्हायरसच्या संकटात इंग्लंड-वेस्ट इंडिज मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. त्यामुळे आता हळुहळु क्रिकेटही पूर्वपदावर येऊ लागले आहे. आज दक्षिण आफ्रिकेत एका आगळ्यावेगळ्या सामन्याचं आयोजन केलं गेलं आहे. तीन संघ, एक सामना अशा या सामन्याची संकल्पना आहे.  Solidarity Cup असे या सामन्याला नाव देण्यात आले आहे आणि क्रिकेटमध्ये प्रथमच असा प्रयोग होत असल्यानं सर्वांना त्याची उत्सुकताही लागलेली आहे. या सामन्यात एक अजब कॅच पाहायला मिळाला, पण तो Out की Not Out हे ठरवण्यासाठी पंचांना थर्ड अंपायरची मदत घ्यावी लागली. ( 3TC Solidarity Cup South Africa) 

अशी झाला प्रथम फलंदाजीचा निर्णयया सामन्यात तीन संघ सहभागी झाल्यामुळे नाणेफेक कशी होईल, याची उत्सुकता होती. त्यातही एक शक्कल लढवण्यात आली. तीनही संघाच्या कर्णधारांसमोर तीन बॉक्स ठेवण्यात आले आणि त्यात नंबर असेलेले चेंडू होते. 1 नंबरचा चेंडू ज्याला मिळेल त्याची पहिली फलंदाजी... एबी डिव्हिलियर्सनं पहिला बॉक्स निवडला आणि त्यात 3 क्रमांकाचा चेंडू निघाला. त्यानंतर टेंबा बमूमानं चेंडू निवडला आणि रिझा हेनड्रीक्स यानं.... त्यामुळे किंगफिशर पहिली फलंदाजी, काईट्स पहिली गोलंदाजी करणार आहेत. काईट्सच्या गोलंदाजांचा पहिल्या दोन षटकात संयमानं फलंदाजी करणाऱ्या किंगफिशरच्या खेळाडूंनी नंतर तुफान फटकेबाजी केली. जॅनेमन मलाननं तुफान फटकेबाजी केली. पाच षटकांत अर्धशतकी धावा फलकावर झळकावल्यानंतर किंगफिशरला पहिला धक्का बसला. त्यापाठोपाठ मलानही माघारी परतला. त्यानं 15 चेंडूंत 31 धावा चोपल्या. किंगफिशर्सनं सहा षटकांत 2 बाद 56 धावा केल्या.त्यानंतर फलंदाजीला आलेल्या इगल्स संघानं 6 षटकांत 1 बाद 66 धावा केल्या. एडन मार्करामनं 23 चेंडूंत 47 धावा कुटल्या, तर एबीनं 7 चेंडूत 11 धावा केल्या. इगल्सच्या डावात मार्करामनं टोकावलेला चेंडू किंगफिशरच्या क्षेत्ररक्षकानं उत्तमरित्या टिपला, पण त्यानं फलंदाजाला बाद केलं का?पाहा व्हिडीओ...

यूएईत की महाराष्ट्रात? IPL 2020 चं भविष्य ठाकरे अन् मोदी सरकारच्या हातात!

तीन टीम, एक मॅच; आज रंगणार क्रिकेटचा जबरदस्त सामना, जाणून घ्या संघ, वेळ अन् नियम!

बीसीसीआयला मोठा धक्का, IPLच्या माजी विजेत्या संघाला द्यावे लागतील 4800 कोटी; जाणून घ्या कारण 

महेंद्रसिंग धोनीचा हटके लूक; CSKनं शेअर केला व्हिडीओ

आव्हानातही आनंद साजरा करणं, हे फक्त सैनिकांनाच जमू शकतं; वीरूनं शेअर केला इमोशनल Video

पाकिस्तानी क्रिकेटपटूनं ब्रिटनमध्ये जन्मलेल्या मुलीशी केलंय लग्न; घरी आली नन्ही परी!

टॅग्स :द. आफ्रिकाएबी डिव्हिलियर्स