आव्हानातही आनंद साजरा करणं, हे फक्त सैनिकांनाच जमू शकतं; वीरूनं शेअर केला इमोशनल Video

संकटासमोर खचून न जाता त्याचा सामना करण्याची गरज आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 01:15 PM2020-07-18T13:15:11+5:302020-07-18T13:16:17+5:30

whatsapp join usJoin us
Only few men have the courage to enjoy in challenging situations, Virender Sehwag shares video of Indian soldiers   | आव्हानातही आनंद साजरा करणं, हे फक्त सैनिकांनाच जमू शकतं; वीरूनं शेअर केला इमोशनल Video

आव्हानातही आनंद साजरा करणं, हे फक्त सैनिकांनाच जमू शकतं; वीरूनं शेअर केला इमोशनल Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसच्या काळात सर्वांना घरीच रहावे लागत आहे. हे संकट कधी संपणार? पूर्वीसारखी परिस्थिती कधी होणार? घराबाहेर पडता येणार की नाही? आदी बरेच प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात घर करून बसले आहेत. या संकटावर मात करण्यासाठी संयम हाच एक मार्ग आहे. या संकटकाळामुळे इंडियन प्रीमिअर लीगवरही अनिश्चिततेचं सावट आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची हिरमोड झाली आहे. या संकटासमोर खचून न जाता त्याचा सामना करण्याची गरज आहे आणि ते समजावून सांगण्यासाठी भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकाला नक्कीच लढण्याचे बळ मिळेल... (Virender Sehwag shares video of Indian soldiers doing bhangra on Indo-Pak border)

या व्हिडीओत भारतीय सैनिक पंजाबी डान्स करताना पाहायला मिळत आहे. भारत-पाकिस्तान सीमेनजीक पहारा देणाऱ्या सैनिकांचा हा व्हिडीओ आहे. सेहवागनं लिहिलं की,''आव्हानांचा आनंदानं सामना करण्याचं धाडस फार कमी लोकांकडे असतं. भारत-पाक सीमेनजीक सैनिक भांगडा करत आहेत. त्यांचा हा जल्लोष आणि एनर्जी पाहताना आनंद वाटतोय.''  (Virender Sehwag shares video of Indian soldiers doing bhangra on Indo-Pak border)

पाहा व्हिडीओ... 


सेहवागनं पोस्ट केलेला हा व्हिडीओ 1 लाख 73 हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. ट्विटरवर 34 हजार लाईक्स आणि 4000 रिट्विट मिळाले आहेत.  सेहवाग नेहमीच भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करत आला आहे. मागील आठवड्यात त्यानं सैनिक वाढदिवस साजरा करत असतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. तोही व्हिडीओ साडेपाच लाखांहून अधिकवेळा पाहिला गेला होता.

सेहवागनं 104 कसोटी, 251 वन डे सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केलं आहे. 2007च्या ट्वेंटी-20 आणि 2011च्या वन डे वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो सदस्य होता. 2015मध्ये त्यानं निवृत्ती घेतली.  

यूएईत की महाराष्ट्रात? IPL 2020 चं भविष्य ठाकरे अन् मोदी सरकारच्या हातात!

तीन टीम, एक मॅच; आज रंगणार क्रिकेटचा जबरदस्त सामना, जाणून घ्या संघ, वेळ अन् नियम!

बीसीसीआयला मोठा धक्का, IPLच्या माजी विजेत्या संघाला द्यावे लागतील 4800 कोटी; जाणून घ्या कारण 

महेंद्रसिंग धोनीचा हटके लूक; CSKनं शेअर केला व्हिडीओ

Web Title: Only few men have the courage to enjoy in challenging situations, Virender Sehwag shares video of Indian soldiers  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.