3TC Solidarity Cup : एबी डिव्हिलियर्सच्या इगल्स संघाला सुवर्णपदक; जाणून घ्या तीन संघांत कसा लागला निकाल

3TC Solidarity Cup : Solidarity Cup असे या सामन्याला नाव देण्यात आले आणि क्रिकेटमध्ये प्रथमच असा प्रयोग होत असल्यानं सर्वांना त्याची उत्सुकताही लागलेली होती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 18:20 IST2020-07-18T18:15:58+5:302020-07-18T18:20:44+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
3TC Solidarity Cup : AB de Villiers team Eagles won gold medal, silver to Kite's and bronze to Kingfisher  | 3TC Solidarity Cup : एबी डिव्हिलियर्सच्या इगल्स संघाला सुवर्णपदक; जाणून घ्या तीन संघांत कसा लागला निकाल

3TC Solidarity Cup : एबी डिव्हिलियर्सच्या इगल्स संघाला सुवर्णपदक; जाणून घ्या तीन संघांत कसा लागला निकाल

कोरोना व्हायरसच्या संकटात इंग्लंड-वेस्ट इंडिज मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. त्यामुळे आता हळुहळु क्रिकेटही पूर्वपदावर येऊ लागले आहे. आज दक्षिण आफ्रिकेत एका आगळ्यावेगळ्या सामन्याचं आयोजन केलं गेलं. तीन संघ, एक सामना अशा या सामन्याची संकल्पना होती.  Solidarity Cup असे या सामन्याला नाव देण्यात आले आणि क्रिकेटमध्ये प्रथमच असा प्रयोग होत असल्यानं सर्वांना त्याची उत्सुकताही लागलेली होती. एबी डिव्हिलियर्सच्या इगल्स संघानं सुवर्णपदक जिंकले. ( 3TC Solidarity Cup South Africa) 

एबी डिव्हिलियर्सनं 24 चेंडूंत चोपल्या 61 धावा

अशी झाला प्रथम फलंदाजीचा निर्णय
या सामन्यात तीन संघ सहभागी झाल्यामुळे नाणेफेक कशी होईल, याची उत्सुकता होती. त्यातही एक शक्कल लढवण्यात आली. तीनही संघाच्या कर्णधारांसमोर तीन बॉक्स ठेवण्यात आले आणि त्यात नंबर असेलेले चेंडू होते. 1 नंबरचा चेंडू ज्याला मिळेल त्याची पहिली फलंदाजी... एबी डिव्हिलियर्सनं पहिला बॉक्स निवडला आणि त्यात 3 क्रमांकाचा चेंडू निघाला. त्यानंतर टेंबा बमूमानं चेंडू निवडला आणि रिझा हेनड्रीक्स यानं.... त्यामुळे किंगफिशर पहिली फलंदाजी, काईट्स पहिली गोलंदाजी करणार आहेत.( 3TC Solidarity Cup South Africa) 

 

किंगफिशनं प्रथम फलंदाजी करताना पहिल्या 6 षटकांत 2 बाद 56 धावा केल्या. आर हेनड्रीक्स ( 20) आणि जे मलान ( 31) यांनी फटकेबाजी केली. त्यानंतर इगल्सने एडन मार्कराम ( 47) याच्या फटकेबाजीच्या जोरावर पहिल्या सहा षटकांत 1 बाद 66 धावा केल्या, तर काईट्सने 1 बाद 58 धावा केल्या. त्यांच्याकडून स्मट्सने 36 धावा चोपल्या.  ( 3TC Solidarity Cup South Africa) 


दुसऱ्यांदा फलंदाजीला आलेल्या एबीच्या इगल्स संघानं 12 षटकांत 4 बाद 160 धावा केल्या. मार्करामनेही 27 चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्यानंतर आलेल्या काइट्स संघाला 3 बाद 138 धावाच करता आल्या.  किंगफिशर संघाला 5 बाद 113 धावाच करता आल्या. त्यामुळे इगल्सच्या संघानं सुवर्णपदक जिंकलं. 
 

यूएईत की महाराष्ट्रात? IPL 2020 चं भविष्य ठाकरे अन् मोदी सरकारच्या हातात!

तीन टीम, एक मॅच; आज रंगणार क्रिकेटचा जबरदस्त सामना, जाणून घ्या संघ, वेळ अन् नियम!

बीसीसीआयला मोठा धक्का, IPLच्या माजी विजेत्या संघाला द्यावे लागतील 4800 कोटी; जाणून घ्या कारण 

महेंद्रसिंग धोनीचा हटके लूक; CSKनं शेअर केला व्हिडीओ

आव्हानातही आनंद साजरा करणं, हे फक्त सैनिकांनाच जमू शकतं; वीरूनं शेअर केला इमोशनल Video

पाकिस्तानी क्रिकेटपटूनं ब्रिटनमध्ये जन्मलेल्या मुलीशी केलंय लग्न; घरी आली नन्ही परी!

 

Web Title: 3TC Solidarity Cup : AB de Villiers team Eagles won gold medal, silver to Kite's and bronze to Kingfisher