Join us  

3 दिवसांत 2 हॅटट्रिक : बांगलादेशनंतर दीपक चहरचा 'या' संघाला दे धक्का!

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या व अंतिम ट्वेंटी-20 सामन्यांत दीपक चहरनं हॅटट्रिक घेत विक्रम घडवला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 5:06 PM

Open in App

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या व अंतिम ट्वेंटी-20 सामन्यांत दीपक चहरनं हॅटट्रिक घेत विक्रम घडवला होता. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त हॅटट्रिक नोंदवणारा तो दुसरा भारतीय आणि पहिला पुरुष खेळाडू ठरला. यापूर्वी 2012मध्ये भारताच्या एकता बिश्तनं श्रीलंकेविरुद्ध ट्वेंटी-20त हॅटट्रिक नोंदवली होती. या कामगिरीनंतर चहरनं पुन्हा आज हॅटट्रिक नोंदवली.  

लोकेश राहुल व श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकी खेळी करताना संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. या दोघांनी   वैयक्तिक अर्धशतकासह संघाला 5 बाद 174 धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात बांगलादेशकडूनही दमदार खेळ झाला. मोहम्मद मिथून व मोहम्मद नइम यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पण, दीपक चहर (6/7) आणि शिवम दुबे ( 3/30) यांनी संघाला कमबॅक करून दिलं. भारतानं हा सामना 30 धावांनी जिंकला. 

रविवारी झालेल्या या सामन्यानंतर दीपक चहरनं मंगळवारी आणखी एका हॅटट्रिकची नोंद केली. सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत राजस्थान संघाचे प्रतिनिधित्व करताना चहरनं हा पराक्रम केला. त्यानं विदर्भ संघाविरुद्ध 18 धावांत 4 विकेट्स घेतल्या आणि त्यात हॅटट्रिकचा समावेश आहे. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर राजस्थाननं प्रतिस्पर्धी विदर्भला 13 षटकांत 9 बाद 99 धावांत रोखलं. चहरला पहिल्या दोन षटकांत एकही विकेट घेता आली नाही. पण, त्यानं तिसऱ्या षटकात चार विकेट्स घेतल्या. त्यानं पहिल्या चेंडूवर रुषभ राठोडला ( 3) बाद केले. त्यानंतर दर्शन नलकांडे ( 0), श्रीकांत वाघ ( 13) आणि अक्षय वाडकर ( 0) यांना सलग तीन चेंडूंवर माघारी पाठवले.

ट्वेंटी-20तील कोणता विक्रम मोडलाश्रीलंकेच्या अजंथा मेडिंसचा 8 धावांत 6 विकेट घेण्याचा विक्रम मोडला6/7 - दीपक चहर वि. बांगलादेश, 20196/8 - अजंथा मेंडिस वि. झिम्बाब्वे, 20126/16- अजंथा मेंडिस वि. ऑस्ट्रेलिया, 20116/25 - युजवेंद्र चहल वि. इंग्लंड, 2017रणजी करंडक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात दीपक चहरनं 10 धावांत 8 विकेट्स घेतल्या होत्या ( हैदराबाद) 

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशभारतीय क्रिकेट संघराजस्थान