Join us

1983 World Cup Team India: आजच्याच दिवशी भारत पहिल्यांदा बनला होता क्रिकेटचा विश्वविजेता!

कपिल देव ठरला होता वर्ल्ड कप जिंकणारा सर्वात तरूण कर्णधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 14:46 IST

Open in App

1983 World Cup Team India: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २५ जून १९८३ हा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी भारत प्रथमच विश्वविजेता बनला आणि विश्वचषकातील वेस्ट इंडिजची सत्ता संपुष्टात आली. हा विश्वचषक जिंकल्यानंतर भारतात क्रिकेटची लोकप्रियता प्रचंड वाढली. त्यामुळेच भारताने जगाला पुढील काळात सचिन तेंडुलकर, विराट कोहलीसारखे महान क्रिकेटपटू दिले. तसेच आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट बोर्ड आहे.

१९८०च्या दशकात वेस्ट इंडिजचा संघ खूप मजबूत होता. इंग्लंडच्या भूमीवर सलग तिसऱ्यांदा विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. येथील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त होती आणि वेस्ट इंडिजकडे एकाहून एक वेगवान गोलंदाज होते. अशा स्थितीत भारत अंतिम फेरीत पोहोचेल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. पण युवा कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आश्चर्यकारक कामगिरी केली आणि विश्वचषक जिंकला. या टूर्नामेंटमध्ये भारताच्या युवा संघाने अशी कामगिरी केली होती, ज्याचा कोणी विचार केला नव्हता.

भारताने संपवला वेस्ट इंडिजचा दबदबा

१९७५ साली क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात झाली. यावेळी जागतिक क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचा दबदबा होता. या दौऱ्यावर असलेल्या कॅरेबियन संघात व्हिव्हियन रिचर्ड्स आणि क्लाइव्ह लॉईडसारखे खेळाडू होते. या सोबतच वेगवान गोलंदाजांची संपूर्ण फौज विंडीजच्या संघात होती. संपूर्ण दोन दशकांपासून वेस्ट इंडिजकडे अनेक दमदार वेगवान गोलंदाज होते. त्यांना जगभरातील फलंदाज घाबरायचे. पण भारताने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. वेस्ट इंडिजने १९७५ आणि १९७९ विश्वचषक जिंकले होते. १९८३ मध्येही सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन बनणे हे त्यांचे स्वप्न होते. फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड या संघांशी स्पर्धा करावी लागेल, अशी त्यांची अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. भारताने ही स्पर्धा खेळली आणि जिंकली. त्यामुळे कपिल देव विश्वचषक जिंकणारा सर्वात तरुण कर्णधार ठरला.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघकपिल देववेस्ट इंडिजइंग्लंड
Open in App