SA20 Auction 2025 Former Mumbai Indians Star Piyush Chawla : आयपीएलच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात येणाऱ्या SA20 च्या चौथ्या हंगामाला २६ डिसेंबर पासून सुरुवात होत आहे. २५ जानेवारीला या स्पर्धेची फायनल रंगणार आहे. स्पर्धेचे वेळापत्रक निश्चित झाल्यावर या टी-२० लीगसाठी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावाची गोष्ट चर्चेत आलीये. ९ सप्टेंबरला होणाऱ्या लिलावासाठी ना नोंदणी केलेल्या ७८४ खेळाडूंच्या यादीत १३ भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. इथं जाणून घेऊयात कोण आहेत ते भारतीय त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या भारतीय खेळाडूंनी SA20 लिलावासाठी केलीये नाव नोंदणी
BCCI च्या नियमानुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह आयपीएलममधून निवृत्ती घेणारे भारतीय खेळाडू परदेशी लीगमध्ये खेळू शकतात. अनुभवी लेग स्पिनर पीयूष चावलासह जलगती गोलंदाज सिद्धार्थ कौल आणि अंकित राजपूत यासारख्या खेळाडूंनी आता दक्षिण आफ्रिकेतील टी-२० लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. या स्टार खेळाडूंशिवाय महेश आहिर (गुजरात), सरुल कंवर (पंजाब), अनुरित सिंह कथूरिया (दिल्ली), निखिल जागा (राजस्थान), मोहम्मद फॅध, केएस नवीन (तमिळनाडू), अन्सारी मारूफ, इमरान खान (UPCA), व्यंकटेश गलीपेली आणि अतुल यादव (UPCA) या भारतीय खेळाडूंचा लिलावात सहभागी झालेल्या खेळाडूंच्या यादीत समावेश आहे.
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
पीयूष चावलानं सर्वाधिक बेस प्राइजसह नोंदवल आहे नाव
दक्षिण आफ्रिकेतील लीगसाठी भारताचा अनुभवी फिरकीपटू पीयूष चावला आणि इमरान खान व्यतिरिक्त अन्य भारतीय खेळाडूंनी २,००,०० रँड (दक्षिण आफ्रिकेतील चलन) मूळ किंमतीसह नाव नोंदवले आहे. भारतीय चलनानुसार, ही रक्कम जवळपास १० लाख रुपये इतकी आहे. पीयूष चावलाची मुळ किंमत १०,००,००० रँड म्हणजे जवळपास ५० लाख आणि इमरान खान याने ५००,००० रँड म्हणजे जवळपास २५ लाख मूळ किंमतीसह नाव नोंदणी केली आहे. या लीगमध्ये मुंबई इंडियन्स फ्रँचायझी संघही आहे. हा संघ पीयूष चावलाला आपल्या ताफ्यात घेऊ शकतो.
Web Title: 13 Indian Players Including Former Mumbai Indians Star Piyush Chawla Siddharth Kaul And Ankit Rajpoot Registered For The SA20 Auction 2025
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.