भूस्खलनामुळे डोंगर घरावर कोसळला, राष्ट्रीय स्तरावरील महिला क्रिकेटपटूचा मृत्यू

मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन डोंगराचा मोठा भाग तुटून त्याखाली अनेक घरे दबली गेली.

By बाळकृष्ण परब | Published: September 26, 2020 07:55 AM2020-09-26T07:55:16+5:302020-09-26T07:57:45+5:30

whatsapp join usJoin us
National level women cricketer Razia Ahmed death & 5 missing as landslide buries homes in Meghalaya | भूस्खलनामुळे डोंगर घरावर कोसळला, राष्ट्रीय स्तरावरील महिला क्रिकेटपटूचा मृत्यू

भूस्खलनामुळे डोंगर घरावर कोसळला, राष्ट्रीय स्तरावरील महिला क्रिकेटपटूचा मृत्यू

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देही दुर्घटना शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास मेघालयमधील पूर्व खासी जिल्ह्यातील मावनेई भागात घडलीत्यात राष्ट्रीय स्तरावर मेघालयचे प्रतिनिधित्व केलेल्या ३० वर्षीय रझिया अहमदचा मृत्यू झालारझिया अहमद २०११-१२ पासून राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करत होती

शिलाँग - पूर्वोत्तर भारतामध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन डोंगराचा काही भाग घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका महिला क्रिकेटपटूचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना मेघालयमधील पूर्व खासी या डोंगराळ जिल्ह्यात झाली. मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन डोंगराचा मोठा भाग तुटून त्याखाली अनेक घरे दबली गेली. त्यामध्ये रझिया अहमद या महिला क्रिकेटपटूचा मृत्यू झाला. तर पाच अन्य व्यक्ती बेपत्ता आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही दुर्घटना शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास पूर्व खासी जिल्ह्यातील मावनेई भागात घडली. त्यात राष्ट्रीय स्तरावर मेघालयचे प्रतिनिधित्व केलेल्या ३० वर्षीय रझिया अहमदचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला आहे.
मावनेई परिसराच्या सरपंचांनी सांगितले की, रझिया अहमदचा मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात आला आहे. तसेच पाच अन्य व्यक्ती बेपत्ता आहेत. सध्या पोलीस आणि होमगार्डच्या पथकाकडून बचाव अभियान सुरू आहे.

मेघालय क्रिकेट असोसिएशनचे महासचिव गिडिओन खारकोंगोर यांनी सांगितले की, रझिया अहमद २०११-१२ पासून राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करत होती. बीसीसीआयने गतवर्षी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये ती मेघालयकडून सहभागी झाली होती.

रझियाच्या संघातील सहकाऱ्यांनीही तिच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. महिला क्रिकेटपटू काकोली चक्रवर्ती हिने सांगितले की, रझियाची आठवण नेहमीच येणार आहे. आम्ही तिच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी प्रार्थना करू. 

इतर महत्त्वाच्या बातम्या
श्वसनाचे विकार असणाऱ्यांवर १०० टक्के प्रभावी ठरणार नाही कुठलीही लस, ICMR च्या संचालकांच्या विधानाने वाढली चिंता

आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे  

Web Title: National level women cricketer Razia Ahmed death & 5 missing as landslide buries homes in Meghalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.