MI vs KXIP : मयांक अग्रवालची डाईव्ह ठरली निर्णायक, किंग्स इलेव्हन पंजाबने मारली बाजी

MI vs KXIP Live Score: किंग्स इलेव्हन पंजाबनं थरारक सामन्यात मुंबई इंडियन्सला नमवून स्पर्धेतील आव्हान कायम राखले आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 18, 2020 06:11 PM2020-10-18T18:11:07+5:302020-10-19T00:26:16+5:30

whatsapp join usJoin us
MI vs KXIP Live Score Mumbai Indians vs Kings XI Punjab IPL 2020 Live Score and Match updates | MI vs KXIP : मयांक अग्रवालची डाईव्ह ठरली निर्णायक, किंग्स इलेव्हन पंजाबने मारली बाजी

MI vs KXIP : मयांक अग्रवालची डाईव्ह ठरली निर्णायक, किंग्स इलेव्हन पंजाबने मारली बाजी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

MI vs KXIP Latest News : दोन गुणांच्या महत्वाच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) पूर्ण जीव ओतून खेळ केला. लोकेश राहुलच्या दमदार खेळीनंतरही पंजाबला बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये मोहम्मद शमीनं मुंबई इंडियन्सला बरोबरीत रोखले. किंग्स इलेव्हन पंजाबने ( Kings XI Punjab) सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) रोखून सामना पुन्हा सुपर ओव्हरमध्ये नेला. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये किरॉन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या यांनी मुंबई इंडियन्सला १ बाद ११ धावा करून दिल्या. KXIPच्या ख्रिस गेलनं पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला त्यानंतर एक धाव व मयांक अग्रवालनं चौकार खेचला. पुन्हा एक चौकार खेचून त्यानं पंजाबचा विजय पक्का केला.

MI vs KXIP Latest News & Live Score :

ट्रेंट बोल्टची गोलंदाजी
पहिल्याच चेंडूवर ख्रिस गेलचा षटकार
दुसऱ्या चेंडूवर ख्रिस गेलची एक धाव
तिसऱ्या चेंडूवर मयांक अग्रवालचा चौकार
चौथ्या चेंडूवर मयांक अग्रवालचा चौकार
 

दुसरी सुपर ओव्हर
ख्रिस जॉर्डन गोलंदाजी
पहिल्या चेंडूवर किरॉन पोलार्डची एक धाव
दुसरा चेंडू वाइड
तिसऱ्या चेंडूवर हार्दिकी पांड्याची एक धाव
चौथ्या चेंडूवर किरॉन पोलार्डचा चौकार
पाचवा चेंडू वाइड
सहाव्या चेंडूवर दुसरी धाव घेताना हार्दिक पांड्या धावबाद
सातवा चेंडू निर्धाव
आठव्या चेंडूवर मयांक अग्रवालनं अडवला षटकार, मुंबईला मिळाल्या दोन धावा ( MI -१ बाद ११) 

मोहम्मद शमी गोलंदाजी
पहिल्या चेंडूवर क्विंटन डी'कॉकची एक धाव
दुसऱ्या चेंडूवर रोहित शर्माची एक धाव
तिसऱ्या चेंडूवर क्विंटन डी'कॉकची एक धाव
चौथ्या चेंडूवर शून्य धाव
पाचव्या चेंडूवर रोहित शर्माची एक धाव
सहाव्या चेंडूवर एक धाव अन् सामना पुन्हा सुपर ओव्हरमध्ये 

सुपर ओव्हरचा थरार
जसप्रीत बुमराह गोलंदाजी
पहिल्या चेंडूवर लोकेश राहुलची एक धाव
दुसऱ्या चेंडूवर निकोलस पूरन झेलबाद
तिसऱ्या चेंडूवर लोकेश राहुलची एक धाव
चौथ्या चेंडूवर दीपक हुडाची एक धाव
पाचव्या चेंडूवर लोकेश राहुलच्या दोन धावा
सहाव्या चेंडूवर लोकेश राहुल बाद

१८ व्या षटकात जसप्रीत बुमराहनं सामना फिरवला. त्यानं पंजाबचा अखेरचा आशास्थान असलेल्या लोकेश राहुलचा त्रिफळा उडवला. लोकेशनं ५१ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७७ धावा केल्या. 

IPL 2020त ५०० धावा करण्याचा पहिला मान लोकेश राहुलनं पटकावला. शिवाय त्यानं सर्वाधिक ५ अर्धशतकं व एक शतकही आतापर्यंत या मोसमात झळकावलेले आहे. लोकेशनं सलग तिसऱ्या पर्वात ५००+ धावा करतान ख्रिस गेलच्या ( २०११-१३) विक्रमाशी बरोबरी केली. डेव्हिड वॉर्नरनं २०१४ ते २०१७ च्या पर्वात सलग चार वेळा ५००+ धावा केल्या होत्या.  
 

निकोलस पुरननेही ताबडतोड खेळी केली, पण त्याचा अडथळा दूर करण्यासाठी रोहितनं बुमराहला बोलावलं आणि हा डाव यशस्वी ठरला. पूरन १२ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २४ धावांवर माघारी परतला. लोकेश राहुलनं ३५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. 
 

प्रत्युत्तरात पंजाबला चौथ्या षटकांत मयांक अग्रवालच्य रुपानं पहिला धक्का बसला. जसप्रीत बुमराहनं त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर ख्रिस गेल व लोकेश राहुल यांनी ४२ धावांची भागीदारी केली. गेल चांगल्या फॉर्मात दिसत होता, परंतु राहुल चहरच्या फिरकीच्या जाळ्यात तो अडकला. गेल २४ धावा ( १ चौकार व २ षटकार) करून बाद झाला. 
 

किरॉन पोलार्डनं अखेरच्या षटकांत धावा कुटल्या. अर्शदीप सिंगच्या एका षटकात पोलार्ड व नॅथन कोल्टर नायर यांनी दोन षटकार व दोन चौकारांसह २२ धावा चोपून काढल्या.  या दोघांनी नाबाद ५७ धावांची भागीदारी केली. पोलार्डनं १२ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ३४ आणि कोल्टर-नायलनं १२ चेंडूंत २४ धावा चोपल्या. मुंबई इंडियन्सनं ६ बाद १७६ धावा केल्या. 
 

क्विंटन डी'कॉकनं केली सचिन तेंडुलकरच्या १० वर्षांपूर्वीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी

मैदानावर आलेल्या हार्दिक पांड्यानं पहिल्याच चेंडूंवर खणखणीत षटकार खेचला. क्विटन डी'कॉकनं सातत्यपूर्ण खेळ करताना ३९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. 

क्विंटन आणि कृणाल पांड्या यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांची ५८ धावांची भागीदारी रवी बिश्नोई यानं तोडली. कृणाल ३४ धावांवर माघारी परतला आणि मैदानावर आलेल्या हार्दिक पांड्यानं पहिल्याच चेंडूंवर खणखणीत षटकार खेचला. 

Image

मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तिसऱ्याच षटकात रोहित शर्माला ( ९) माघारी पाठवून KXIPनं मोठं यश मिळवलं. अर्शदीप सिंगनं हिटमॅनचा त्रिफळा उडवला. त्यानंतर मोहम्मद शमीनं पुढच्याच षटकात सूर्यकुमार यादवला भोपळाही फोडू न देता बाद केले. अर्शदीपनं ६व्या षटकात इशान किशनला ( ७) बाद करून MIला कोंडीत पकडले. क्विंटन डी'कॉक एका बाजूनं खिंड लढवत आहे.  SRH vs KKR Latest News : कोलकाता नाईट रायडर्सचा 'Super' विजय, चौथ्या स्थानावरील पकड मजबूत

डेव्हिड वॉर्नरनं मोडला विराट कोहलीचा विक्रम; परदेशी फलंदाजांमध्येही ठरला पहिला!

Kings XI Punjab XI: लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, दीपक हुडा, ख्रिस जॉर्डन, एम अश्विन, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग  

Mumbai Indians XI: रोहित शर्मा, क्विंटन डी'कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, नॅथन कोल्टर नायल, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह 

IPL 2020 : चेन्नई, राजस्थान यांना आता एक 'चूक' पडणार महागात; Play Offच्या आशा अजूनही जीवंत

Point Tableची परिस्थिती

  1. दिल्ली कॅपिटल्स - ९ सामने, ७ विजय, २ पराभव, १४ गुण
  2. मुंबई इंडियन्स - ८ सामने, ६ विजय, २ पराभव, १२ गुण
  3. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - ९ सामने, ६ विजय, ३ पराभव, १२ गुण
  4. कोलकाता नाईट रायडर्स - ८ सामने, ४ विजय, ४ पराभव, ८ गुण
  5. सनरायझर्स हैदराबाद - ८ सामने, ३ विजय, ५ पराभव, ६ गुण
  6. चेन्नई सुपर किंग्स - ९ सामने, ३ विजय, ६ पराभव, ६ गुण
  7. राजस्थान रॉयल्स - ९ सामने, ३ विजय, ६ पराभव, ६ गुण
  8. किंग्स इलेव्हन पंजाब - ८ सामने, २ विजय, ६ पराभव, ४ गुण

दुबईतील संघांची कामगिरी  
मुंबई इंडियन्स - ४ पैकी तीन विजय व १ पराभव
किंग्स इलेव्हन पंजाब - ५ पैकी २ विजय व ३ पराभव 

आज कोणते विक्रम मोडणार
- रोहित शर्मानं २१ धावा केल्यास मुंबई इंडियन्सकडून तो IPL मध्ये ४००० धावा पूर्ण करेल.
- आयपीएलमध्ये ५० बळी पूर्ण करण्यासाठी क्विंटन डी'कॉकला आज एक बळी टिपावा लागेल
-  आयपीएलमध्ये १०० षटकार व २५०० धावा पूर्ण करण्यासाठी लोकेश राहुलला अनुक्रमे ४ मोठे फटके व ७५ धावा कराव्या लागतील
- किंग्स इलेव्हन पंजाबकडून १५०० धावा पूर्ण करण्यासाठी ख्रिस गेलला आज ८९ धावा कराव्या लागतील 
 

Web Title: MI vs KXIP Live Score Mumbai Indians vs Kings XI Punjab IPL 2020 Live Score and Match updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.