Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघानं नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सला ( Kolkata Knight Riders) प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. दिनेश कार्तिक आणि इयॉन मॉर्गन यांच्या फटकेबाजीच्या जोरावर KKRनं ५ बाद १६३ धावा केल्या. प्रत्युत्तरात SRHला केन विलियम्सन व जॉनी बेअरस्टो यांनी चांगली सुरुवात करून दिली. पण, ल्युकी फर्ग्युसननं तीन धक्के देताना KKRला कमबॅक करून दिले. दरम्यान, SRHचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरनं ( David Warner) या सामन्यात मोठा विक्रम नोंदवताना विराट कोहलीलाही मागे टाकले.

राहुल त्रिपाठी आणि शुबमन गिल यांनी KKRला सावध सुरुवात करून दिली. पण, पॉवर प्लेच्या अखेरच्या चेंडूवर टी नटराजननं KKRला पहिला धक्का दिला. राहुल त्रिपाठी २३ धावांवर त्रिफळाचीत झाला. नितिश राणासह गिल SRHच्या गोलंदाजांचा सामना करत होता, परंतु त्यांच्या धावांचा वेग संथ वाटत होता. राशिद खाननं गिलला जीवदान दिले, परंतु १२व्या षटकांत राशिदनं त्याला बाद केले. प्रियम गर्गनं ( Priyam Garg) Stunning Running Catch घेतला. गिल ३७ चेंडूंत ५ चौकारांसह ३६ धावा करून माघारी परतला. विजय शंकरनं पुढील षटकात नितिश राणाला ( २९) बाद केले आणि त्याचाही झेल गर्गनं टिपला.

आंद्रे रसेलकडून पुन्हा अपेक्षा भंग झाला. टी नटराजननं फेकलेल्या १५ व्या षटकात रसेल (९) विजय शंकरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. दिनेश कार्तिक आणि इयॉन मॉर्गन यांनी अखेरच्या षटकांत दमदार खेळ करताना कोलकाताला समाधानकारक पल्ला गाठून दिला. कोलकातानं ५ बाद १६३ धावा केल्या. कार्तिक-मॉर्गननं पाचव्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. कार्तिक १४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २९ धावांवर नाबाद राहिला. मॉर्गननं २३ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३४ धावा केल्या.  

प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादकडून जॉनी बेअरस्टोसह केन विलियम्सन सलामीला आला. या दोघांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये अर्धशतकी धावा पूर्ण करताना संघाला दमदार सुरुवात करून दिली. सातव्या षटकात KKRला ही सेट जोडी तोडण्यात यश आलं. ल्युकी फर्ग्युसननं पहिल्याच चेंडूवर विलियम्सनला बाद केले. विलियम्सन १९ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह २९ धावा करून माघारी परतला. डेव्हिड वॉर्नरनं तिसऱ्या क्रमांकावर प्रियम गर्गला पाठवले, परंतु तोही (४) फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. वरुण चक्रवर्थीनं SRHचा सलामीवीर बेअरस्टोला बाद केले. बेअरस्टोनं २८ चेंडूंत ७ चौकारांसह ३६ धावा केल्या. फर्ग्युसनच्या यॉर्करनं मनीष पांडेचा ( ६) त्रिफळा उडवला.


दरम्यान, डेव्हिड वॉर्नरनं १०वी धाव घेताच IPLमध्ये ५००० धावांचा पल्ला पार केला. IPL मध्ये ५००० धावा करणारा तो पहिलाच परदेशी खेळाडू ठरला. त्यानं १३५ डावांमध्ये ही कामगिरी करताना विराट कोहलीचा सर्वात जलद ५००० धावांचा विक्रम मोडला.

Fastest to 5000 IPL runs
डेव्हिड वॉर्नर ( 5000*) - १३५ डाव
विराट कोहली ( ५७५९)- १५७ डाव
सुरेश रैना ( ५३६८) - १७३ डाव
रोहित शर्मा ( ५१४९) - १८७ डाव
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: SRH vs KKR Latest News : David Warner becomes first overseas player to score 5000 runs in IPL; Fastest to 5000 IPL runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.