MI vs KXIP Latest News : क्विंटन डी'कॉकनं केली सचिन तेंडुलकरच्या १० वर्षांपूर्वीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी

MI vs KXIP Latest News : सलग पाच सामने जिंकणाऱ्या बलाढ्य मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) संघाला आज खेळल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या ( IPL 2020) लढतीत मनोधैर्य उंचावलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबच्या ( Kings XI Punjab) आव्हानाला सामोरे जावे लागत आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 18, 2020 08:51 PM2020-10-18T20:51:45+5:302020-10-18T20:52:17+5:30

whatsapp join usJoin us
MI vs KXIP Latest News : 3 Consecutive 50s for MI in IPL; Sachin Tendulkar in 2010 and Quinton De Kock  in 2020 | MI vs KXIP Latest News : क्विंटन डी'कॉकनं केली सचिन तेंडुलकरच्या १० वर्षांपूर्वीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी

MI vs KXIP Latest News : क्विंटन डी'कॉकनं केली सचिन तेंडुलकरच्या १० वर्षांपूर्वीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

MI vs KXIP Latest News : सलग पाच सामने जिंकणाऱ्या बलाढ्य मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) संघाला आज खेळल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या ( IPL 2020) लढतीत मनोधैर्य उंचावलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबच्या ( Kings XI Punjab) आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. MI  संघ एका विजयामुळे प्ले-ऑफच्या समीप जाणार आहे तर आणखी एक पराभव KXIP संघाला या शर्यतीतून बाहेर होण्यास पुरेसा ठरू शकतो. त्यामुळे विजयाच्या दृढ निश्चयानं KXIPचे खेळाडू मैदानावर उतरलेले दिसले. अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमी यांनी MIला सुरुवातीलाच धक्के देत बॅकफुटवर पाठवले. 

मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तिसऱ्याच षटकात रोहित शर्माला ( ९) माघारी पाठवून KXIPनं मोठं यश मिळवलं. अर्शदीप सिंगनं हिटमॅनचा त्रिफळा उडवला. त्यानंतर मोहम्मद शमीनं पुढच्याच षटकात सूर्यकुमार यादवला भोपळाही फोडू न देता बाद केले. अर्शदीपनं ६व्या षटकात इशान किशनला ( ७) बाद करून MIला कोंडीत पकडले. क्विंटन डी'कॉक एका बाजूनं खिंड लढवत आहे. क्विंटन आणि कृणाल पांड्या यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांची ५८ धावांची भागीदारी रवी बिश्नोई यानं तोडली. कृणाल ३४ धावांवर माघारी परतला. अर्शदीप सिंगनं उडवला हिटमॅन रोहित शर्माचा त्रिफळा; MIला दिले धक्के, Video

मैदानावर आलेल्या हार्दिक पांड्यानं पहिल्याच चेंडूंवर खणखणीत षटकार खेचला. क्विटन डी'कॉकनं सातत्यपूर्ण खेळ करताना ३९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. षटकारानं धावांचं खातं उघडणाऱ्या हार्दिकला ( ८) मोहम्मद शमीनं बाद केलं. मुंबई इंडियन्सकडून सलग तीन सामन्यांत ५०+ धावा करणारा क्विंटन हा दुसरा फलंदाज ठरला. यापूर्वी २०१०मध्ये सचिन तेंडुलकरनं अशी कामगिरी केली होती.  



Kings XI Punjab XI: लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, दीपक हुडा, ख्रिस जॉर्डन, एम अश्विन, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग  
Mumbai Indians XI: रोहित शर्मा, क्विंटन डी'कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, नॅथन कोल्टर नायल, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह  
 

Web Title: MI vs KXIP Latest News : 3 Consecutive 50s for MI in IPL; Sachin Tendulkar in 2010 and Quinton De Kock  in 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.