Ruturaj Gaikwad Scored A Terrific Hundred In Vijay Hazare Trophy 2025-26 : विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील उत्तराखंड विरुद्धच्या सामन्यात ऋतराज गायकवाडनं दमदार शतकी खेळीसह लक्षवधून घेतले. महाराष्ट्र संघ अडचणीत असताना नेतृत्वाला साजेशी खेळी करून दाखवत त्याने संघाचा डाव सावरला. या शतकी खेळीसह त्याने यंदाच वर्षात खास विक्रमही नोंदवला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अवघ्या ५० धावांवर आघाडीचे तीन फलंदाज तंबूत
अहमदाबादच्या ADSA रेल्वे ग्राउंडवर रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या महाराष्ट्र संघाला उत्तराघंडच्या गोलंदाजांनी थक्क्यावर धक्के दिले. अर्शिन कुलकर्णी १३ (१७), सिद्धेशवीर १२ (२०) आणि अंकित बावणे १२(२०) अल्व धावसंख्या करून तंबूत परतल्यावर कर्णधार ऋतुराज गायकवाड चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. १० षटकांत ५० धावांवर आघाडीच्या तीन फलंदाजांनी नांगी टाकल्यावर ऋतुराज गायकवाडनं आपल्या फलंदाजीली कौशल्य दाखवून देताना दमदार शतक झळकावले.
VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
ऋतुराजशिवाय सत्यजित बचाव अन् रामकृष्ण घोषनं केली उत्तम फलंदाजी
ऋतुराज गायकवाडनं या सामन्यात ११३ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १२४ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने निर्धारित ५० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात ३३१ धावा करत उत्तराखंडसमोर तगडे आव्हान ठेवल्याचे पाहायला मिळाले. ऋतुराजशिवाय या सामन्यात सत्यजित बचाव याने ४५ चेंडूत ५६ धावांची तर रामकृष्ण घोष याने ३१ चेंडूत ४७ धावांची उपयुक्त खेळी केली.
ऋतुराज गायकवाडसाठी हे वर्ष राहिलं खास; शतकी खेळीसह टीम इंडियातील आपल्या जागेवर टाकला रुमाल
ऋतुराज गायकवाडसाठी यंदाच वर्ष एकदम खास राहिलं आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील शतकी खेळी आधी त्याने बुची बाबू स्पर्धेसह दुलीप ट्रॉफी, रणजी आणि भारत 'अ' संघाकडून दक्षिण आफ्रिका 'अ' विरुद्धच्या मालिकेतही शतकी खेळी केल्याचे पाहायला मिळाले होते. या कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याला टीम इंडियात संधी मिळाली. या मालिकेतही त्याने शतकी डाव साधला. आता न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी त्याने टीम इंडियातील आपल्या जागेवर रुमाल टाकला आहे. श्रेयस अय्यरच्या कमबॅकवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना मध्यफळीत बीसीसीआय पुन्हा एकदा ऋतुराजला पहिली पसंती देऊ शकते.