Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा

Jason Holder Bowling Video: सुरुवातीला घडलेला प्रकार काही काळ कुणालाच समजू शकला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 17:42 IST2026-01-02T17:42:07+5:302026-01-02T17:42:45+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
jason holder bizarre bowling ilt20 ball high in air over batter head stumps internet video viral | Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा

Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा

Jason Holder Bowling Video: वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार जेसन होल्डर हा सर्वोत्तम टी२० खेळाडूंपैकी एक मानला जातो. त्याची उंची सामान्य क्रिकेटपटूंपेक्षा खूपच जास्त आहे. म्हणूनच त्याच्याकडून लांब आणि उत्तुंग षटकार मारण्याची अपेक्षा केली जाते. तो त्या अपेक्षा पूर्ण करतो. त्याची गोलंदाजीदेखील प्रभावी आहे. होल्डर सध्या त्याच्या गोलंदाजीमुळे आणि मुख्यत: एका विशिष्ट चेंडूमुळे क्रिकेट जगतात चर्चेत आला आहे. होल्डर सध्या ILT20 लीगमध्ये खेळत आहे. तो दुबई कॅपिटल्सचा सामना करणाऱ्या अबू धाबी नाईट रायडर्सचा भाग आहे. या सामन्यात होल्डरने असा चेंडू टाकला की सारेच अवाक् झाले. फलंदाज किंवा होल्डरच्या संघालाही घडलेला प्रकार काही काळ समजू शकला नाही आणि अखेर साऱ्यांनाच हसू अनावर झाले.

चेंडू चौथ्या स्लिपमध्ये पोहोचला

जेसन होल्डर दुबई कॅपिटल्सविरुद्ध गोलंदाजी करत होता. एका षटकात, होल्डर गोलंदाजी करण्यासाठी आला तेव्हा चेंडू त्याच्या हातातून निसटला घसरला आणि उंच उडून थेट चौथ्या स्लिपमध्ये गेला. चेंडू फलंदाज किंवा यष्टीरक्षकापर्यंत पोहोचलाच नाही. चेंडू थेट चौथ्या स्लिपच्या जागेवर जाऊन पडला. हे ऐकून होल्डर स्वतः आश्चर्यचकित झाला. तो स्वतःच घडलेल्या प्रकारावर हसू लागला. चेंडू फलंदाजाच्या डोक्यावरून बराच वर गेल्याने पंचांनी तो नो बॉल दिला. घडलेला प्रकार पाहून सारेच थक्क झाले.

व्हिडिओ व्हायरल

होल्डरच्या या चेंडूचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे कसे घडले याबद्दल सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. चाहतेही मजेदार कमेंट करत आहेत. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर अबू धाबीने हा सामना ५० धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना संघाने सात गडी गमावून १५८ धावा केल्या. दुबई कॅपिटल्स १६.२ षटकांत १०८ धावांवर ऑलआउट झाला.

Web Title : जेसन होल्डर की अजीब गेंद पर हंसी, क्रिकेट जगत में वायरल।

Web Summary : ILT20 लीग में जेसन होल्डर की एक असामान्य गेंद वायरल हो गई। गेंद फिसलकर बल्लेबाज के ऊपर से चौथी स्लिप में चली गई, जिसके परिणामस्वरूप नो-बॉल हुई। होल्डर और अन्य लोग हंस पड़े क्योंकि अबू धाबी 50 रनों से जीत गया।

Web Title : Jason Holder's bizarre delivery sparks laughter, goes viral in cricket world.

Web Summary : Jason Holder's unusual delivery in the ILT20 league became a viral sensation. The ball slipped, flying over the batsman to fourth slip, resulting in a no-ball. Holder and others reacted with amusement as Abu Dhabi won by 50 runs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.