IPL 2025 Orange Cap Race : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात पोहचली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने पहिल्या क्वालिफायरमधील विजयासह थेट फायनल गाठलीये. त्यानंतर प्लेऑफ्समधील एलिमिनेटरच्या लढतीत मुंबई इंडियन्सच्या संघाने गुजरात टायटन्सच्या संघाला बाहेरचा रस्ता दाखवत क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केलाय. आता दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
GT 'आउट', पण अजूनही साई सुदर्शन टॉपला; फायनल गाठणारा विराट खूपच मागे राहिला
१ जूनला नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यातील निकालानंतर स्पर्धेतील दुसरा फायनलिस्ट ठरेल. गुजरात टायटन्सचा संघ स्पर्धेबाहेर पडला असला तरी या संघाच्या डावाची सुरुवात करणारा साई सुदर्शन अजूनही यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वलस्थानावर आहे. विराट कोहलीच्या संघाने फायनल गाठली असली तरी तो या शर्यतीत मागे पडल्याचे दिसते. दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील सूर्यकुमार यादवला ऑरेंज कॅप पटकवण्याची संधी आहे. कारण तो सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण यासाठी एकतर मुंबई इंडियन्सच्या संघाने फायनल पर्यंत मजल मारायला हवी. नाहीतर क्वालिफायर २ मध्ये सूर्याला मोठी खेळी करावी लागेल.
४४ बॉलमध्ये ८४...! रोहित शर्मासोबत 'खेळणारा' तो जितेंद्र भाटवडेकर कोण? रणजी खेळलाय की गल्ली क्रिकेट...
साईचा धमाका, ६ अर्धशतके अन् एका शतकासह कुटल्यात ७५९ धावा
साई सुदर्शन याने यंदाच्या हंगामात १५ सामन्यातील १५ डावात ५४.२१ च्या सरासरीसह १५६.१७ च्या दमदार स्ट्राइक रेटसह ७५९ धावा केल्या आहेत. त्याच्या भात्यातून ६ अर्धशतकासह १ शतकही पाहायला मिळाले आहे. सध्याच्या घडीला ऑरेंज कॅप त्याच्याकडेच आहे. त्याला मागे टाकून ऑरेंज कॅपवर कब्जा करणं फक्त अन् फक्त सूर्यकुमार यादवलाच शक्य होऊ शकते.
सचिन तेंडुलकरनंतर सूर्यकुमार हा डाव साधणार का?
यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे. सलग १५ सामन्यात २५ पेक्षा अधिक धावा करत सातत्यपूर्ण खेळीसह त्याने खास वर्ल्ड रेकॉर्डही प्रस्थापित केल्याचे पाहायला मिळाले. सूर्यकुमार यादवनं १५ सामन्यातील १५ डावात ५ अर्धशतकाच्या मदतीने ६७३ धावा केल्या आहेत. साईला मागे टाकून ऑरेंज कॅप पटकवण्यासाठी त्याला अजून ८७ धावा कराव्या लागतील. क्लालिफायर २ मधील एका मोठ्या खेळीसह तो हा डाव साधू शकतो. जर या सामन्यात तो कमी पडला अन् MI नं हा सामना जिंकून फायनल गाठली तर त्याला आणखी एक सामना मिळेल. त्यामुळे त्याला मुंबई इंडियन्सकडून सचिन तेंडुलकरनंतर ऑरेंज कॅप पटकवणारा दुसरा खेळाडू होण्याची संधी मिळेल.
सर्वाधिक अर्धशतक झळकवणाऱ्या विराटनं शतक मारलं तरी तो कमीच पडेल, कारण...
विराट कोहलीनं यंदाच्या हंगामात सर्वाधिक ८ अर्धशतकासह १४ सामन्यात ६१४ धावा काढल्या आहेत. साई सुदर्शन आणि विराट कोहली यांच्यात १४५ धावांचे अंतर आहे. विराट कोहली फायनल खेळणार असला तरी एवढी मोठी धावसंख्या एका डावात करणं मुश्किलच आहे.
Web Title: IPL 2025 Orange Cap Race Virat Kohli vs Suryakumar Yadav Who Will Surpass Sai Sudharsan See Record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.